Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात मास्क सक्ती होणार का?; राजेश टोपे स्पष्टच बोलले

राज्यात मास्क सक्ती होणार का?; राजेश टोपे स्पष्टच बोलले

मुंबई । Mumbai

राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांमध्ये वाढत (Increase in corona patients) होत असल्याचे दिसून आले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्राचे आरोग्य सचिव (Health Secretary) प्रदीप व्यास (Pradip Vyas) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मास्क (Mask) सक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी माध्यमांशी बोलताना मास्कबाबत राज्य सरकारचे (State Government) नेमके आवाहन काय आहे, याविषयी सविस्तर भूमिका मांडली आहे…

- Advertisement -

याबाबत बोलतांना राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले की, मुंबई, पुणे, पालघर आणि रायगडचा काही भाग, ठाणे या भागात थोडीफार संख्या वाढत आहे. त्याला अनुसरून देशाच्या केंद्रीय आरोग्य विभागाच्या (Central Health Department) लोकांनी पत्र पाठवले आहे की, या विभागांसाठी तुम्हाला रुग्णसंख्या वाढ रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील.

त्याबाबतीत परवा टास्क फोर्सच्या बैठकीत (task force meeting) स्पष्टपणे ठरले की जिथे गर्दीची ठिकाणे आहेत, तिथे मास्क वापरण्याचे आवाहन करावे. ते सक्तीचे नाही, असे टोपेंनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, मास्क बाबतीत पुढील पंधरा दिवसांत निर्णय घेण्यात येईल. तसेच रुग्णांची संख्या, त्यांना लागणाऱ्या उपचारांची (treatment) गरज हे पाहून मास्क सक्ती करायची का हे ठरवले जाईल. रुग्णसंख्या काही ठिकाणी वाढत असली तरी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या नगण्य आहे.

तसेच ज्यांचे लसीकरण (Vaccination) राहिले असेल त्या नागरिकांनी लसीकरण करून घेणे गरजेचे असल्याचे सांगत राज्यातील आरोग्य यंत्रणेने (health system) चाचण्या वाढवाव्यात असे आवाहनही टोपे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या