कडक निर्बंधाच्या फेरविचारावर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले...

राजेश टोपे
राजेश टोपेRajesh Tope

मुंबई

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच आपण लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे अशाही शुभेच्छा दिल्या. यावेळी कडक निर्बंधावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

आरोग्यमंत्री म्हणाले, “दुकाने बंद आहेत हे मान्य आहे, पण जीव वाचवण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देता येईल का यावर मंत्रिमंडळात विचार करू. निर्बंध कडक केले आहेत, लॉकडाऊन केलेले नाही,'’ असे स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिले.

राजेश टोपे बोलताना म्हणाले की, ‘"काल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. केंद्राच्या जेवढ्या टीम आजपर्यंत आल्या, त्यांचे नियम आणि आयसीएमआरच्या गाईडलाईनचं तंतोतंत पालन महाराष्ट्राने आजवर केले आहे. अनेकांचा विरोध घेऊन कठोर निर्णय घेतले आहेत.

लसीकरणाचा तुटवडा

राज्यात सध्या दररोज साडेचार लाख लोकांचं लसीकरण केलं जातंय. मात्र, लस नाही म्हणून अनेक केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. लसीकरणासाठी आलेल्या लोकांना घरी पाठवावे लागत आहे. आमची आधीपासून हिच मागणी होती की, लसीचा पुरवठा आम्हाला लवकर करा आणि आमच्या गतीने करा. त्यामुळे आम्हाला अधिक वेगाने आणि उत्तमरित्या लसीकरण करणे शक्य होईल.

कोवॅक्सिसची मागणी वाढली

कोरोनाच्या महामारीला आळा घालण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या सर्वांची प्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक आहे, त्यासाठी लसीकरणाचा मार्ग हा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. लसीकरण मोफत आहे, लसीकरण सुरक्षित आहे. तसेच लसीकरण तुमच्या घराच्या जवळ आहे. त्यामुळे शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर टीम केलेल्या आहेत. ग्रामीण भागांत टीम केलेल्या आहेत. ज्यामध्ये आशा वर्कर्स, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मदतनीस, तसेच ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक आणि तलाठी या साऱ्यांचा समावेश होतो. केंद्राने राज्याला कोविशील्ड खासकरुन कोवॅक्सिन द्यावे. कारण कोवॅक्सिनची मागणी लोकांकडून वाढलेली आहे. लस पुरवली तर आमचा एक महत्त्वाचा प्रश्न सुटेल.

तीन दिवसांत साठा संपेल

"महाराष्ट्रात १४ लाख लसींचे डोस शिल्लक असून हा साठा केवळ तीन दिवस पुरेल अशी भीती व्यक्त करताना राजेश टोपे यांनी दर आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची केंद्राकडे मागणी केली आहे. महाराष्ट्रात लसीचे १४ लाख डोस शिल्लक असून ही तीन दिवसांपुरता साठा आहे. पाच लाखांच्या तुलनेत हे डोस तीन दिवसांत संपेल आणि महाराष्ट्रातील लसीकरण बंद होईल.

लॉकडाऊन केवळ शनिवार, रविवारी

माध्यमांशी संवाद साधताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन हा शब्द वापरू नका असे आवाहनही केले. केवळ शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन आहे. बाकीच्या दिवशी फक्त निर्बंध आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com