डॉ. स्वप्नील आत्महत्या प्रकरण : विद्यापीठाकडून चौकशी समिती, शासनाने दिले हे आदेश

डॉ. स्वप्नील आत्महत्या प्रकरण : विद्यापीठाकडून चौकशी समिती, शासनाने दिले हे आदेश

नाशिक

नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयात (Medical College) पदव्युत्तर अभ्यासक्रमातील डॉ. स्वप्नील शिंदे (Dr Swapnil Shinde)या निवासी डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. रॅगिंगमुळेच (Ragging) डॉ. स्वप्नील यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांकडून केला जात आहे. डॉ स्वप्नीलसोबत शिक्षण घेत असलेल्या मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने या प्रकरणी चौकशी समिती नेमली आहे तर दुसरीकडे राज्य शासन स्तरावर चौकशी केली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (minister Amit Deshmukh)यांनी जाहीर केले आहे.

डॉ. स्वप्नील आत्महत्या प्रकरण : विद्यापीठाकडून चौकशी समिती, शासनाने दिले हे आदेश
रँगिग काय आहे ? यासंदर्भातील कायदा काय?

आडगाव येथील डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेजधील पदव्युत्तर अभ्यासक्रमास डॉ. स्वप्नील शिंदे शिकत होता. रँगिंगमुळे (Ragging)त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप होत असल्यामुळे या प्रकरणाची दखल राज्य शासनाने घेतली. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत तीन सदस्यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीला सात दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश विद्यापीठामार्फत देण्यात आला आहे. समितीच्या अहवालानंतरच विद्यापीठामार्फत पुढील कार्यवाही केली जाणार आहे. तसेच कॉलेज प्रशासनाकडेही या प्रकाराबाबत स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.

सरकार या प्रकरणाची चौकशी करेल- अमित देशमुख

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (minister Amit Deshmukh)म्हणाले, “हा मृत्यू नेमकं का झाला, कशामुळे झाला याची अधिकृत माहिती आलेली नाही. पालकांचं म्हणणं एक आहे, महाविद्यालयाचं म्हणणं एक आहे. याची चौकशी शासन स्तरावर घोषित करण्यात येतेय. सरकार या प्रकरणाची चौकशी करेल. रॅगिंग या प्रकारात खूप नियंत्रण मिळवलं आहे. याबाबत प्रतिबंध शासनाने घातले आहेत. हा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत डॉक्टरांच्या पालकांशी संवाद साधू.”

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com