आदित्य ठाकरेंनी मला एक रुपयाही निधी दिला नाही; भुजबळांना शिवसृष्टीला निधी मात्र मिळाला

आमदार सुहास कांदे यांचे आरोप

मनमाड | प्रतिनिधी Manmad

मी वहिनींना शिवसेनेतील (Shivsena) सगळी परिस्थिती सांगितली होती. मात्र, त्यांनी मनावर घेतले नाही म्हणून ही परिस्थिती ओढवली आहे. ही सत्ता हिंदुत्वाच्या (Hidutva) मुद्द्यावर लोकांनी दिली आहे. मोदींना बघून बाळासाहेबांकडे बघून - शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (chief minister eknath shinde) होते. मात्र, शरद पवारांनी (sharad pawar) ऐनवेळी खोडा घातला. पवारांना माहिती होते की, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले तर शिवसेना फुटणार...

ते तेंव्हा नाही तर आता झाले आहे. २७५ कोटीची योजना मी भांडून मिळवली आहे. मी १०० हून अधिक मागण्यांचे पत्र दिले. त्यातील एकालाही उत्तर मिळालेले नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) उभारायला मला निधी दिला नाही. मला आजवर आदित्य ठाकरे यांनी एक रुपया दिला नाही मात्र, भुजबळांना शिवसृष्टीला निधी देण्यात आला.

आदित्य साहेबांच्या हातात शिवबंधन नाही. संध्याकाळी 7 वाजता ठरले होते मेळावा घ्यायचाय. तुमच्या मताच्या भिकेवर मी सावकार - सरकार पाडण्यात पहिल्या 4 मध्ये होतो. जो करते है छाती ठोक के करते है.

एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मारण्याची सुपारी देण्यापासून सुरुवात झाली होती. शिंदे नक्षली भागात पालकमंत्री होते. नक्षल्यांनी शिंदे साहेबांच्या सांगण्यावरून समर्पण केले हे विसरून चालणारे नाही.

अनेकांचे पोलिसांनी एन्काऊंटर केले. शिंदे साहेबांनी सगळ्या पोलिसांना 10 लाख रुपये दिले होते. सगळे नक्षलवादी एकत्र आले आणि शिंदे यांचा खून करायचा ठरले होते असा आरोप कांदेंनी यावेळी केला.

शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देण्याचे ठरले होते. मात्र, एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) झेड प्लस सुरक्षा (Z plus security) द्यायची नाही असा वर्षावरून फोन आला होता. जो 16 व्या वर्षांपासून सेना जपतो आहे, त्याला तुम्ही मारायला निघाले. मला देखील छोट्या राजनचा फोन आला होता असे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी याप्रसंगी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com