मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात : सर्व दुनिया सोडली तर....फक्त शिक्षकच 'नॉन करप्टेड'!

मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात : सर्व दुनिया सोडली तर....फक्त शिक्षकच 'नॉन करप्टेड'!

जि.प.45 शिक्षकांचा जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मान

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यातील जि.प.शाळांमध्ये (district schools) 225 खोल्यांचे बांधकाम (Construction of rooms) सुरु आहे.278 शाळा खोल्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. जिल्ह्यातील 17 शाळांची आदर्श मॉडेल (ideal model) म्हणून निवड करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यावर्षी मराठी शाळांची पटसंख्या (Number of Marathi Schools) देखील वाढली आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच जण जि.प.शाळांमधील गुरुजींमुळे घडले आणि मोठ्या पदांवर पोहोचले आहे. याचे श्रेय शिक्षकांना (teachers) जाते. सर्व दुनिया सोडली (whole world is left) तर फक्त शिक्षकच नॉन करप्टेड (Only teachers are non-corrupt!) आहे, असा दावा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) केला. सोमवारी जळगाव येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात 45 जि.प. (Z.P.)जिल्हा शिक्षक पुरस्कार (District Teacher Awards) वितरण (Distribution) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.

संदीप पाटील डांभुर्णी,ता.यावल यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार
संदीप पाटील डांभुर्णी,ता.यावल यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार

यावेळी आमदार शिरीष चौधरी, आ.राजू मामा भोळे, आमदार अनिल पाटील, आ.डॉ. सुधीर तांबे, महापौर जयश्री महाजन, माजी शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड, माजी जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपे, डॉएट प्राचार्य अनिल झोपे,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, सीईओ डॉ.पंकज आशिया, ग.स.संचालिका प्रतिभा सुर्वे, माजी सभापती मुकुंद नन्नवरे, अतिरिक्त सीईओ बाळासाहेब मोहन, उपमुख्यकार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे-पवार, कॅफो बाबुलाल पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, उपशिक्षणाधिकारी राजेंद्र सपकाळे, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन आणि डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. ना. पाटील पुढे म्हणाले की,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, सीईओ डॉ.पंकज आशिया आणि शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यात शिक्षणाचा चेहरा मोहरा बदलविण्याचे काम केले आहे. जि.प.मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तफावत असली तरी काही उघड्यावरील शाळांच्या आवारात पत्त्यांचा अड्डा बनला आहे. त्यासाठी शाळांना संरक्षण भिंत बांधण्याचे काम केले.

जिल्हा परिषदेच्या शाळांची जिल्ह्यात मोठी मालमत्ता आहे. त्यांचे संरक्षण करण्याची गरज आहे, असे सांगून जिल्ह्यात वातानुकुलित अंगणवाड्या बांधतोय. इंग्रजी येऊ नये, या मताचा मी नाही. इंग्रजी आलीच पाहिजे. मात्र, इंग्रजीला डोक्यावर घेऊ नये, असा सल्ला ना.पाटील यांनी दिला.

याप्रसंगी माजी शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड, आ.राजूमामा भोळे, आ.डॉ. सुधीर तांबे आदींनी मार्गदर्शन केले.आ.राजूमामा भोळे यांनी जि.प.शाळांना 10 लाखांची मदत केली.त्यांचा यावेळी सीईओंच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी तर सूत्रसंचालन मनीषा शिरसाठ, ज्योती राणे, मनीषा पाटील, प्रिया पवार यांनी केले.आभार उपशिक्षणाधिकारी राजेंद्र सपकाळे यांनी मानले.

2020-21 पुरस्कारार्थी

दिनेश मोरे मारवड, ता. अमळनेर, मनिषा पाटील वढवे नवे, ता. भडगाव, नामदेव महाजन मोंढाळे ता.भुसावळ, योगेश घाटे दादानगर नाडगाव, ता. बोदवड, ओमप्रकाश थेटे पिंपळगाव प्र.दे.ता.चाळीसगाव, सोमनाथ देवराज वेले आखातवाडे, ता.चोपडा, माधुरी देसले दोनगाव खुर्द ता.धरणगाव, पद्माकर पाटील टाकरखेडा,ता.एरंडोल, मोनिका चौधरी वडली,ता.जळगाव, माया शेळके खादगाव,ता.जामनेर, विकास पाटील टाकळी,ता.मुक्ताईनगर, सुभाष देसले चिंचपुरे,ता.पाचोरा, सीमा पाटील हिवरखेडे खुर्द,ता.पाचोरा, गजाला तबस्सुम सैय्यद असगर अली रावेर, संदीप पाटील डांभुर्णी,ता.यावल यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार तर उत्तेजनार्थमध्ये कांचन राणे के नारखेडे विद्यालय भुसावळ, विजय चौधरी माध्यमिक विद्यालय निंबोल या शिक्षकांना शाल,श्रीफळ,प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

2021-22 पुरस्कारार्थी

मनिषा गोविंद चौधरी जि.प. प्राथमिक शाळा शिरसाळे, ता.अमळनेर, सचिन हिलाल पाटील जि.प. प्राथमिक शाळा पिंपळगाव बु.ता.भडगाव, समाधान रामचंद्र जाधव, जि.प.प्राथमिक शाळा शिंदी ता.भुसावळ, मालती संजय तायडे जि.प.प्राथमिक मुलींची शाळा, बोदवड, संजीव सिताराम थेटे पदविधर शिक्षक, जि.प.शाळा चौगाव, ता. चोपडा, गोरख मोतीराम वाघ जि.प.शाळा शिंदी ता. चाळीसगाव, ज्योती लिलाधर राणे जि.प.प्राथमिक कन्या शाळा साळवा, ता.धरणगाव, विनायक गोकुळ वाघ जि.प.प्राथमिक शाळा खेडी बु.ाा ता. एरंडोल, सुनील भागवत चौधरी जि.प.मुलांची उच्च प्राथमिक शाळा पाथरी ता. जळगाव, नथ्थू धनराज माळी, गे्रडेड मुख्याध्यापक जि.प.प्राथमिक शाळा चिंचखेडे बु.ाा ता.जामनेर, वैशाली अशोक नांद्रे जि.प.शाळा बोळे तांडा, वसंतवाडी ता, पारोळा, किशोर अभिमन पाटील जि.प.शाळा वडगाव बु.ाा ता.पाचोरा, सुशिला वसंत हडपे ग्रेडेड मुख्याध्यापिका जि.प.प्राथमिक कन्या शाळा मुक्ताईनगर, कल्पना दिलीप पाटील जि.प.प्राथमिक शाळा निंबोळ ता.रावेर, विनोद मनोहर सोनवणे जि.प.प्राथमिक शाळा डांभुर्णी ता.यावल यांचा सन्मान करण्यात आला.

2022-23 पुरस्कारार्थी

दर्शना नथ्थु चौधरी (जि.प. शाळा शिरूड,ता.अमळनेर), मनिषा गोकुळ अहिरराव (जि.प. शाळा यशवंतनगर,भडगाव), रविंद्र माणिक पढार (जि.प शाळा मांडवेदिगर,ता.भुसावळ), मनिषा नारायण कचोरे (जि.प शाळा मनुर, ता. बोदवड),उत्तम धर्मा चव्हाण (जि.प.उच्च प्राथ.शाळा शिवापूर, ता.चाळीसगाव,) विश्वनाथ गोरक्षनाथ पाटील (जि.प. शाळा नागलवाडी, ता.चोपडा), संजय पोपट गायकवाड (जि.प शाळा मुसळी,ता.धरणगाव), लक्ष्मण वामण कोळी (जि.प शाळा चंदनबर्डी,ता.एरंडोल), ललिता नितीन पाटील (जि.प. मुलींची शाळा कानळदा,ता.जळगाव), किर्ती बाबुराव घोेंगडे (जि.प प्राथ.मुलींची शाळा पहूर कसबे,ता.जामनेर), विजय वसंत चौधरी (जि.प. शाळा पिंप्रीनांदू, ता.मुक्ताईनगर), अरुणा मुकुंदराव उदावंत (जि.प. शाळा राजुरी,ता.पाचोरा), छाया प्रभाकर भामरे (जि.प शाळा मोंढाळे,ता.पारोळा), रामराव ज्ञानोबा मुरकुटे (जि.प. शाळा खिरोदा प्रचा,ता.रावेर),समाधान प्रभाकर कोळी (जि.प केंद्र शाळा साकळी,ता.यावल ) या शिक्षकांना शाल,श्रीफळ, प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

शिक्षणाच्या 16 कलमी कार्यक्रमांतर्गत मुलींसाठी स्वतंत्र शौचालय, बाला प्रकल्प, निपुन भारत अभियानअंतर्गत असे विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहे. कोविड काळात शैक्षणिक स्तर घसरला असलातरी गुणवत्तेसाठी चांगले काम शिक्षकांना करावे लागेल. पहिल्या येणार्‍या दहा विद्यार्थ्यांपेक्षा शेवटच्या स्तरातील दहा विद्यार्थ्यांना केंद्रीत करा.

डॉ.पंकज आशिया सीईओ, जि.प.

जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा मुलगा असल्याने घरात शिस्तीचे वातावरण आणि शिक्षकांबद्दलचा अभिमान आहे. कोविडच्या काळात शिक्षकांनी आव्हान पेलत शेवटच्या घटकांपर्यंत ज्ञानगंगा पोहचविण्याचे काम केले. कोविडमध्ये शिक्षणाची दरी जाणवू दिली नाही. शेवटच्या घटकातील विद्यार्थ्यांना घडविण्याचे आव्हान शिक्षक पेलतील यात शंका नाही.

डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि उद्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील हेच राहतील अशी आशा बाळगुया. ज्या शिक्षकांना बालक आणि पालक यांच्यातील फरक ओळखता आला ते शिक्षक सर्वगुण संपन्न असतात. काही शिक्षक चारित्र्य संपन्न असतात. काही व्टेंटी-व्टेंटी खेळाप्रमाणे विद्यार्थी घडविण्याचे काम करतात. त्यामुळे शिक्षकांवर नियमांचे बंधने नको.

अनिल पाटील, आमदार

शिक्षणाच्या 16 कलमी कार्यक्रमातून जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी दर्जोन्नतीचे काम केले. प्रथम सीईओंचे अभिनंदन. इंग्रजी माध्यमांची मुले जिल्हा परिषदेकडे येवू लागली. ही कौतुकाची बाब आहे. विद्यार्थ्यांवर ज्ञानाबरोबरच संस्कार देत आहे. मात्र, चांगला माणूस घडविण्याचे काम शिक्षकांनी करणे गरजचे आहे.

शिरीष चौधरी, आमदार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com