शिंदे गटाने उठाव केला नसता तर...; गुलाबराव पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्यासह शिवसेना (Shivsena) आणि अपक्ष आमदारांनी (MLA) केलेल्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळून शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाले. मात्र, या मोठ्या बंडानंतर राज्यात दररोज राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. त्यातच आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी मोठा दावा केला आहे...

ते म्हणाले की, २०१९ साली राष्ट्रवादीने (NCP)भाजपाबरोबर (BJP)शपथ घेतली होती. कोंबडा जेव्हा बांग देतो आणि सकाळ होते, तशीच ती सकाळ होती. शिंदे गटाने हा उठाव केला नसता, तर राष्ट्रवादीने भाजपबरोबर सत्ता स्थापन केली असती,” असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे.

तसेच शिर्डीमध्ये (Shirdi) राष्ट्रवादीचे अधिवेशन सुरू असून ते संपताच राज्यातील सरकार कोसळेल असा दावा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, की अधिवेशन संपले आहे. मात्र, सरकार कोसळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहावा तसेच आमदारांमध्ये फूट पडू नये म्हणून राष्ट्रवादीकडून अशा प्रकारची विधाने केली जात असल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com