मंत्री दीपक केसरकरांचे सूचक विधान; म्हणाले, तर शिवसेना पुन्हा...

मंत्री दीपक केसरकरांचे सूचक विधान; म्हणाले, तर शिवसेना पुन्हा...

मुंबई | Mumbai

शिवसेना (Shivsena) पक्षात फूट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटातील (Shinde and Thackeray Group) नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून संघर्ष होताना पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांच्या दालनासमोर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील नेते तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Minister Deepak Kesarkar) यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे बोलले जात होते...

त्यावर केसरकर यांनी मी आगामी एक किंवा दोन दिवसांत बोलेन,असे म्हटले होते. त्यानंतर आज त्यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी शिर्डी (Shirdi) येथे साईबाबांचे दर्शन घेत नववर्षाची (New Year) सुरुवात केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

यावेळी बोलतांना केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरेंबद्दल मला आदर आहे. मात्र आता कटुता कमी करणे हे उद्धवजींच्या हातात आहे. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांसाठी लढा लढवला, ते सहजासहजी सोडून जात नाहीत. निश्चितपणे काहीतरी घडलेले आहे, ज्यामुळे आमदार (MLA) बाहेर पडले. नेमकं काय घडलं होते, याचे उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले तर शिवसेना पुन्हा एकसंध होण्यास वेळ लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, मी उद्धव ठाकरे यांचा आदर ठेवणारा माणूस आहे. जेव्हा घर पेटतं तेव्हा आधी आगीवर नियंत्रण मिळवावे लागतं, आग कशामुळे लागली ते नंतर बघू ,अगोदर आपण आपले घर सुरक्षित ठेवू असे मी तेव्हा उद्धव ठाकरे यांना बोललो होतो. मात्र ते त्यांची लोक जे सांगतात त्यावर आपले मत बनवत असतात. मी जे बोलणार ते उद्धवजींबाबत नाही तर त्यांना जे फिडबँक देतात ‌त्यांना बोलणार आहे. मी सगळ्या प्रश्नांना उत्तर देणार असल्याचेही केसरकरांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, मला ते बोलले त्याचं दु; ख वाटलं नाही. पण जे काही माध्यमात दाखवलं गेलं त्यामुळे भावना दुखावल्या गेल्या आहेत. असे होता कामा नये , प्रेमाचा आदर आहे तो कमी होता कामा नये. मी सगळ्यांना उत्तर देणार आहे. तसेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आमदारांचे मन जिंकले. त्यामुळेच आमदार त्यांच्यासोबत गेले. त्यावेळी काय काय घटना घडल्या हे बोलून दाखवणार आहे. मी ते मनाच्या कोपऱ्यात दडवून ठेवलेले आहे. सध्या नव वर्ष आहे म्हणून मी बोलत नाही. एक दोन दिवस जाऊ द्या. नंतर मी बोलतो. मी जेव्हा बोलेन तेव्हा महाराष्ट्रच (Maharashtra) नव्हे तर प्रत्येक शिवसैनिकाला सत्य समजेल, असेही केसरकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com