मंत्री दीपक केसरकरांकडून बच्चू कडूंची मनधरणी

बच्चू कडू
बच्चू कडू

मुंबई | Mumbai

अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी केलेल्या आरोपांमुळे शिंदे गटातील (Shinde Group) आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) चांगलेच संतापले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रवी राणा यांच्याकडून कडू यांच्यावर बेछूट आरोप सुरु आहेत. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतले, असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला होता...

याविरोधात दाद मागूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी याप्रकरणात अद्याप कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे आता बच्चू कडू यांनी सरकारची साथ सोडून वेगळ्या वाटेने जाण्याचा इशारा दिला आहे. यानंतर शिंदे गटाकडून त्यांची मनधरणी करण्याचे काम सुरू असून बच्चू कडू यांनी सबुरीने घ्यावे ते लवकरच मंत्रीपदावर असतील असे सूचक वक्तव्य मंत्री दीपक केसरकर (Minister Deepak Kesarkar) यांनी केले आहे.

ते म्हणाले की, बच्चू कडू हे जेष्ठ नेते असून त्यांच्याबरोबर दोन आमदार आहेत. अन्य आमदारांच्यावतीने ते बोलत असतील तर, मला त्यातील वस्तुस्थिती माहिती नाही. लवकरच ते मंत्रीपदी दिसतील, अशी आमची अपेक्षा आहे. जे व्यक्ती मंत्री होणार आहेत, त्यांनी थोड संयम ठेवायला हवा, असे केसरकर यांनी सांगितले आहे.

तर बच्चू कडू यांनी २० वर्षे आम्ही लोकांमधून निवडून येतो तरी देखील इतक्या खालच्या पातळीवर आम्हाला टीका सहन करावी लागते. रवी राणा एकट्याच्या जीवावर ही टीका करणार नाहीत. त्यांची तेवढी कुवत नाही. त्यामुळे त्यांचा बोलविता धनी कोण आहे, हे तपासणे गरजेचे आहे, असे म्हटले होते.

दरम्यान, काल पत्रकार परिषद घेत बच्चू कडू यांनी एक गौप्यस्फोटही केला होता. बच्चू कडूला थंड करायचे ठरवले गेले. तो व्हिडिओ लवकरच माझ्याकडे येणार आहे. केंद्राची मदत घेऊन बच्चू कडूला अडचणीत आणण्याचे षडयंत्र रचले जात आहे. माझ्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे कडू यांनी म्हटले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com