Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या.... म्हणून तुम्ही उपमुख्यमंत्रीपदही घेतले नाही; केसरकरांची शिवसेनेवर टीका

…. म्हणून तुम्ही उपमुख्यमंत्रीपदही घेतले नाही; केसरकरांची शिवसेनेवर टीका

मुंबई | Mumbai

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन (Monsoon session) सुरू झाले आहे. शिंदे – फडणवीस सरकारचे (Shinde-Fadnavis Government) हे पहिलेच अधिवेशन असून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

- Advertisement -

तसेच शिवसेना (Shivsena) पक्षात बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पक्षबांधणीसाठी महाराष्ट्र (Maharashtra) दौरा करत आहे. शिवसंवाद यात्रेच्या (Shiv Samvad Yatra) माध्यमातून ते महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात जाऊन शिवसैनिक आणि जनतेची भेट घेत आहे. त्यानंतर आता शिंदे गटाचे (Shinde Group) प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे…

यावेळी केसरकर म्हणाले की, भाजपने तुम्हाला उपमुख्यमंत्रीपदही दिले होते. एखादा दुसरा मनुष्य, साधा शिवसैनिकही वाढू नये यासाठी युतीत असताना उपमुख्यमंत्रीपदही घेतले नाही. मी याला साक्षीदार आहे. मुंबईत (Mumbai)हे घडत असताना मी वर्षावरही होतो. मुंबईत महापालिकेवर (Mumbai Municipal Corporation) भाजपचे (BJP) बहुमत येण्याची शक्यता होती, तसे घडलेही असते.

देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उद्धव ठाकरेंचा मान राखला. त्यांनी जेव्हा एकमुखी पाठिंबा दिला. मराठी माणसाचा स्वाभिमान कसा राखला जाईल हे पाहिले, त्यांच्याशी तुम्ही केलेल्यांना काय म्हणायचं? मी सर्वसामान्य माणूस आहे आणि मोठ्यांचा आदर ठेवतो, म्हणून मी माझ्या तोंडाने त्या शब्दाचा उच्चार करत नाही. पण काय घडले हे महाराष्ट्राच्या जनतेला कधी ना कधी कळलेच पाहिजे, असे केसरकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आदित्य ठाकरे महाराष्ट्रात विविध ठिकाणी जाऊन लोकांमध्ये खोटी माहिती पसरवण्याचे काम करत आहेत. मी यापूर्वीही सांगितले होते की, आदित्य ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नातू असल्यामुळे मी त्यांचा आदर करतो. पण ते गोबेल्सच्या रस्त्यावर गेले तर ते आम्ही सहन करणार नाही. ही भूमी गोबेल्सच्या नीतींना मान्यता देणारी भूमी नाही, ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) भूमी आहे, असेही दीपक केसरकर यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, आमचे मुख्यमंत्री दिवसरात्र काम करतात. त्यांच्यावर तुम्ही टीका करता, वाईट शब्द बोलता. आम्हाला बोलण्याचा अधिकार ज्यांनी निवडून दिले त्या जनतेला आहे. आपण जर बोललो नाही तर लोकांना खरे वाटते. त्यामुळे आमचा प्रवक्ता कोणत्या विषयावर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला याबद्दल बोलेल. गोबेल्स नीती आहे ती महाराष्ट्रात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असेही केसरकरांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या