Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याशिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात मंत्री दीपक केसरकरांचे मोठे विधान

शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात मंत्री दीपक केसरकरांचे मोठे विधान

मुंबई | Mumbai

राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांचा (Transfer of Teachers) मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातच आता शिक्षण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राज्यात भविष्यात शिक्षकांचा बदल्या न करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचे विधान केले आहे. त्यामुळे वातावरण आणखी तापण्याची शक्यता असून शिक्षणमंत्र्यांच्या या सूचनेला राज्यातील शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे.

- Advertisement -

Nashik Accident : कारचा भीषण अपघात; तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

मंत्री केसरकर म्हणाले की, “शिक्षकांच्या बदल्या होऊ नये असे मी म्हटले आहे, शिक्षकांच्या बदल्या थांबवल्या असे मी म्हटलो नाही. बदल्या करणे योग्य आहे की नाही याबाबत विचार सुरू आहे. हा धोरणात्मक निर्णय मी एकटा घेऊ शकणार नाही, मुख्यमंत्र्यांशीसुद्धा या संदर्भात चर्चा करावी लागेल, कॅबिनेटला विश्वासात घेऊन या शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात निर्णय घ्यावा लागेल.” असे त्यांनी म्हटले आहे.

वलखेड फाट्यावर तिहेरी अपघात; एक जागीच ठार

दरम्यान, केसरकर यांच्या या विधानावर शिक्षक संघटनानी (Teachers Associations) नाराजी व्यक्त केली असून शिक्षकांच्या बदल्या या तीन वर्षांनी झाल्याचे पाहिजे असे म्हणत शासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. तसेच शासनाने जर हा निर्णय घेतला नाही तर राज्यभरात रान पेटवू असा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या