Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याDada Bhuse : सुषमा अंधारेंच्या 'त्या' आरोपांवर मंत्री दादा भुसेंचे स्पष्टीकरण; म्हणाले,...

Dada Bhuse : सुषमा अंधारेंच्या ‘त्या’ आरोपांवर मंत्री दादा भुसेंचे स्पष्टीकरण; म्हणाले, आरोप…

मुंबई | Mumbai

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare ) यांनी ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला पुण्यातील (Pune) ससून रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी फोन केला होता, असा गंभीर आरोप केला होता. तसेच कॉंग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकरांनी (MLA Ravindra Dhangekar) पत्रकार परिषद घेत ड्रग्ज माफिया ललित पाटील पळून जाण्यात शिंदे गटातील एका मंत्र्याचा हात आहे, असे म्हटले होते. त्यानंतर आता मंत्री भुसेंनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -

Sushma Andhare : “ड्रग्ज माफिया ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी दादा भुसेंचा फोन”; ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

सुषमा अंधारें यांनी केलेल्या आरोपांना (Allegations) प्रत्युत्तर देतांना मंत्री दादा भुसे म्हणाले की, “सुषमा अंधारे यांनी प्रचंड मोठा आरोप केला आहे. सुषमा अंधारे यांचा महिला म्हणून आदर करतो. त्यांना ज्या पद्धतीची चौकशी अपेक्षित असेल त्यांनी ती करावी. त्या चौकशीतून जे सिद्ध होईल ते जगासमोर येईल. सुषमा अंधारेंनी माहिती घेऊन आरोप करावेत. माझे कॉल रेकॉर्ड चेक करावेत, त्यासंबंधित सर्वांचे कॉल रेकॉर्डे चेक करावेत. असे आरोप करणे म्हणजे एखाद्याला आयुष्यातून उठवण्यासारखं आहे. चौकशीमध्ये सत्य समोर येईल आणि नंतर आरोप करणाऱ्यांना माफी मागावी लागेल. माझ्यावर करण्यात आलेले आरोप सिद्ध न झाल्यास मानहानीचा दावा (A Claim For Defamation) दाखल करेल,” असा इशारा मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.

पोलिसांची मोठी कारवाई! ड्रग्ज माफिया भूषण पाटीलसह साथीदाराला वाराणसीतून अटक

सुषमा अंधारे यांनी नेमका काय आरोप केला होता?

ड्रग्ज माफिया ललित पाटीलला दाखल करण्याकरता ससून प्रशासन उदासीन होते. ससूनच्या प्रशासनावर दबाव आणून तिथे दाखल करण्यासाठी कोणी फोन केला? हे एकदा तपासलं पाहिजे. कोणत्या आमदाराचा फोन होता, हे तपासलं पाहिजे. मी थेट नाव घेऊन सांगेन की दादा भुसेंचे फोन रेकॉर्ड चेक करून घ्यावेत”, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता. तसेच दादा भुसे नाशिकचे (Nashik) पालकमंत्री आहेत. तर ललित पाटील देखील नाशिकचा असल्याने दादा भुसेंकडे सर्वाधिक रोख असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले होते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महायुती सरकारचा विधीमंडळ समित्यांचा फॉर्म्युला ठरला! भाजप मोठा भाऊ पण चलती मात्र लहान भावांची

- Advertisment -

ताज्या बातम्या