
मुंबई | Mumbai
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) आणि कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांच्याविषयी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर आता पाटील यांनी या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे...
ते म्हणाले की, भीक म्हणजे काय तर आपण महापुरुषांच्या जयंतीसाठी किंवा वेगवेगळ्या उत्साहाच्या वेळी वर्गणी जमा करतो. त्यामुळे या भीक शब्दाने जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे. मी एवढ्या छोट्या मनाचा माणूस नाही. माझ्या रक्ता-रक्तात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील हे आहेत. त्यामुळे कोणाच्याही मनात गैरसमज निर्माण झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करण्यास माझी काहीही हरकत नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad district) पैठण (Paithan) संतपीठच्या कार्यक्रमात महापुरूषांबाबत बोलतांना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, 'या देशात शाळा कुणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केल्या, बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केल्या. महात्मा फुलेंनी केल्या. या शाळा सुरू करताना गर्व्हनमेंटने त्यांना अनुदान दिलं नाही, त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरू करतोय पैसे द्या, असे त्यांनी म्हटले होते.