महाराष्ट्रातील रामभक्तांसाठी आदित्य ठाकरेंनी अयोध्येत केली 'ही' मोठी घोषणा

महाराष्ट्रातील रामभक्तांसाठी आदित्य ठाकरेंनी अयोध्येत केली 'ही' मोठी घोषणा

नवी दिल्ली । New Delhi

शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री (Minister of Environment) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अयोध्येच्या (Ayodhya) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जय श्रीरामचा नारा दिला आहे. तसेच त्यांनी या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील (Maharashtra) रामभक्तांसाठी मोठी घोषणा केली आहे...

यावेळी बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, ही आमची तीर्थयात्रा असून राजकीय यात्रा नाही. तसेच आम्ही इथे राजकारण करायला आलेलो नसून दर्शन घ्यायला आलो आहे. तसेच अयोध्येत महाराष्ट्र सदनासाठी (Maharashtra Sadan) जागा मिळावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ((CM Yogi Adityanath) यांच्याशी चर्चा करणार असून १०० खोल्यांचे हे माहाराष्ट्र सदन असेल अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.

पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, या तीन-चार वर्षाच्या काळात शिवसेना (shivsena) परिवारासोबत अयोध्येत चौथ्यांदा येत आहे. परंतु उत्साह, जल्लोष तसाच आहे आणि आता तर आपण बघत असाल, की मंदिर (Temple) निर्माण होत असताना अजून उत्साहाने अनेक शिवसैनिक महाराष्ट्र, उत्तर प्रदेश किंवा अन्य राज्यांमधून रामजन्मभूमीत रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आल्याचे म्हटले आहे.

तसेच ठाकरे पुढे म्हणाले की, २०१८ मध्ये मी सर्वप्रथम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आलो होतो आणि तेव्हा त्यांनी घोषणा केली होती, की पहले मंदिर फिर सरकार.. योगायोगाने जेव्हा आम्ही नोव्हेंबर २०१८ मध्ये आलेलो ती घोषणा झाल्यानंतर, कदाचित असे नव्याने घडून आले की त्यानंतरच न्यायालयीन प्रक्रियेला चालना मिळाली आणि एक वर्षात बरोबर न्यायालयाचा (court) निकाल आला. न्यायालयाच्या निकालामुळे आज इथे मंदिर निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com