गौण खनिज माफियांना पावणे दोन कोटींचा दंड

एप्रिलपासून सुरू आहे कारवाई
न्यूज अपडेट/News Update
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या आठवड्यात चर्चेत असलेला गौण खनिज विभाग एका अहवालाद्वारे पुन्हा चर्चेत आला आहे. जिल्ह्यातील अवैध गौण खनिज (Mining) उत्खनन आणि अवैध वाहतुकीचे (Traffic) प्रकार अद्याप थांबलेले नसल्याचे समोर येत आहे...

यावर गौण खनिज विभाग आणि जिल्हा प्रशासनाने कारवाई करत एप्रिलपासून आतापर्यंत 104 कारवाया केल्या असून त्यात माफियांना तब्बल पावणेदोन कोटी रुपयांपर्यंत दंड (Penalty) ठोठावला आहे.

गेल्या काही वर्षांपासून गौणखनिजाचे अवैध उत्खनन व चोरट्या वाहतुकीत वाढ झाली आहे. या घटनांमधून गौणखनिज माफिया गब्बर झाले आहेत. त्यामुळे अशा माफियांविरोधात राज्य सरकारने पुढाकार घेत वाळू, दगड, मुरूम अशी गौणखनिजची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस प्रणाली बसवून ती शासनाच्या महाखनिज अॅपशी जोडणे बंधनकारक केले आहे.

मात्र, गौणखनिज शाखा व तालुकास्तरावरील भरारी पथकांनी केलेल्या कारवायांमध्ये वाळू वाहतूकदार, खडी क्रशरचालक व खाणपट्टाधारकांनी वाहनांवर जीपीएस बसविले नसल्याचे आढळून आले. तसेच अवैध उत्खननाचे प्रकारही निदर्शनास आले. त्यामुळे अशा घटनांमध्ये प्रशासनाने संबंधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाया केल्या आहेत.

प्रशासनाने एप्रिल ते जून या काळात ८८ कारवाया करत त्यात १ कोटी ५८ लाख ४२ हजार ८७७ दंड केला आहे. तर १ ते ३१ जुलै या काळात सिन्नर देवळा तालुक्यात कारवाई करत त्यातून 71 लाख 3 हजार 450 रुपयांचा दंड करण्यात आला.

१ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या दीड महिन्यात दिंडोरी व सिन्नर या दोन तालुक्यांतून ६ वाहनांवर कारवाई झाली. यात ६ लाख ६१ हजार २८० रुपयांचा दंड केला. त्यानुसार प्रशासनाने अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांना एकूण १ कोटी ८१ लाख ९९ हजारांचा दंड ठोठावला आहे. प्रशासनाने आतापर्यंत दंडाचे १ कोटी १५ लाख ७४ हजार ६४० रुपये संबंधितांकडून वसूल केले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com