चार चाकी वाहनांसाठी नितीन गडकरींची मोठी घोषणा

चार चाकी वाहनांसाठी नितीन गडकरींची मोठी घोषणा

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Niting Gadkari) यांनी आज चार चाकी (vehicles)वाहनासंदर्भात महत्वाची घोषणा केली. आता ८ प्रवासी असलेल्या चार चाकी वाहनांमध्ये ६ एअर बॅग (airbags)लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे टि्वट नितीन गडकरी (Niting Gadkari)यांनी केले. प्रवास सुरक्षित होण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सामान्यत: मध्यमवर्गीय लोकांकडून लहान कार खरेदी केल्या जातात. यात साधारण दोन एअरबॅग्स असतात. ऑटोमेकर्स फक्त मोठ्या आणि महागड्या कारमध्येच जास्त एअरबॅग देतात. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याआधीच लहान आणि स्वस्त कारमध्येही सहा एअरबॅग्स देण्याचं आवाहन कार उत्पादक कंपन्यांना केलं होतं. ज्या वाहनांमधून आठ प्रवासी वाहतुक होते अशा वाहनांमध्ये आता 6 एअरबॅग्स असणं अनिवार्य असणार आहे. त्यामुळे रस्ते अपघातात होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होणार आहे.

चार चाकी वाहनांसाठी नितीन गडकरींची मोठी घोषणा
वाहन धारकांना मोठा फटका :इन्शुरन्स प्रिमियममध्ये होणार वाढ

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com