Video स्मार्ट सिटीला व्यापारी वैतागले : एम.जी.रोडवर लाखो लिटर पाण्याची नासाडी

 Video स्मार्ट सिटीला व्यापारी वैतागले : एम.जी.रोडवर लाखो लिटर पाण्याची नासाडी

नाशिकमधील स्मार्ट सिटीचा कामातील घोळामुळे नाशिककर वैतागले आहेत. ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत, महिने-महिने काम प्रलंबित आहेत, यामुळे व्यापारी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आता त्यात भर म्हणजे स्मार्ट सिटीसाठी खोदकाम करतांना पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे. तीन दिवसांपासून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. परंतु त्याची चिंता स्मार्ट सिटीच्या ठेकेदार नाही किंवा महानगरपालिकेलाही नाही.

नाशिकमधील (nashik) स्मार्ट सिटीचा (smart city )कामातील घोळामुळे नाशिककर वैतागले आहेत. ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत, महिने-महिने काम प्रलंबित आहेत, यामुळे व्यापारी (business)व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आता त्यात भर म्हणजे स्मार्ट सिटीसाठी खोदकाम करतांना पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली (water wastage)आहे. तीन दिवसांपासून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. परंतु त्याची चिंता स्मार्ट सिटीच्या ठेकेदार नाही किंवा महानगरपालिकेलाही नाही.

 Video स्मार्ट सिटीला व्यापारी वैतागले : एम.जी.रोडवर लाखो लिटर पाण्याची नासाडी
शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन...

आता तीन दिवसांपासून पाण्याची नासाडी

एम.जी.रोडवर श्याम शिल्क दुकानासमोर खोदकाम करतांना पाण्याची पाईपलाईन शुक्रवारी फुटली. परंतु ठेकेदाराने तीन दिवस उलटूनही त्याची दुरुस्ती केली नाही. रोज त्यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यासंदर्भात व्यापाऱ्यांनी तक्रार केली. तरीही त्याची दखल ठेकेदारने किंवा मनपाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही. पाण्याचे मूल्य अजूनही नाशिक मनपाला कळत नसेल तर नागरिकांना कसे कळणार? असा सवाल ‌उपस्थित होत आहे.

 Video स्मार्ट सिटीला व्यापारी वैतागले : एम.जी.रोडवर लाखो लिटर पाण्याची नासाडी
या जाहिरातीमुळे आलिया भट का आली वादात?

ठेकेदाराला दंड करा

स्मार्ट सिटीच्या ठेकेदारामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याची दखल घेऊन मनपा प्रशासन पाण्याची नासाडीसंदर्भात दंड संबंधित ठेकेदारास करणार का? असा प्रश्न आहे.

फुटलेली पाईपलाईन जोडण्यासंदर्भात ठेकेदारास अनेक वेळा तक्रार केली. परंतु आज करु, पल्बंरला सांगितले आहे, असे उत्तरे ठेकेदार देत आहे. परंतु अजूनही पाईपलाईन दुरुस्ती झालेली नाही.

रवींद्र मणियार, संचालक, श्याम सिल्क

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com