दूध संघावरुन राजकारणाला उकळी

jalgaon-digital
6 Min Read

जळगाव । jalgaon

जिल्हा दुध संघासंदर्भात (District Milk Union) माहिती गोळा करणारा मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) हा साधा सभासदही (Members) नाही. मग यांच्याकडे ही माहिती आली कुठून? (Where did the information come from?) त्यांनी माहितीची चोरी केली (Theft of information) असल्याचा आरोप (Accusation) आ. खडसे (MLA Khadse) यांनी केला. तसेच आमदार मंगेश चव्हाण यांनी आधीही अनेक तक्रारी (Many complaints) केल्या आणि नंतर तडजोडी (compromise) केल्या. राज्यात सरकार त्यांचे आहे, त्यांच्यात हिंम्मत असेल तर विधानसभेत त्यांनी हे मुद्दे मांडावे असे आव्हानही आ. खडसे यांनी मंगेश चव्हाण यांना दिले.

मोटारींची दलाली करणारे एवढे श्रीमंत झालेच कसे? असा सवाल करीत त्यांनी टोलाही लगावला. मंगेश चव्हाण यांनी सुरूवातील आरटीओसंदर्भात तक्रारी केल्या. पुढे त्या तक्रारींचे काय झाले? सरकार त्यांचे असतांना कारवाई होत नाही. याचाच अर्थ यांची सरकारमध्ये पत नाही असा आरोपही त्यांनी केला. जिल्ह्यात भाजपा वाढविण्यात माझे मोठे योगदान आहे. मंगेश चव्हाण हे आयते आमदार झाले असून त्यांचे जेवढे वय नाही तेवढी वर्षे माझी राजकारणात गेली आहे. त्यामुळे मंगेश चव्हाण दुध संघाला आणि माझ्या परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही आ. खडसे यांनी केला.

चौकशीचा पोलिसांना अधिकार दिला कुणी?

दुध संघात लोणी व दुधाच्या भुकटीच्या साठ्याच्या बॉक्सची जवळपास एक ते दीड कोटींच्या वस्तुची चोरी झाली आहे. मात्र चोरीचा गुन्हा दाखल करणे सोडून पोलीस दुध संघाच्या चौकशीसाठी वेगवेगळी माहिती मागत आहेत. चोरीचा तपास सोडून दुध संघाच्या चौकशीचा अधिकार पोलिसांना कुणी दिला? असा सवाल करीत पोलीस प्रशासन सत्ताधार्‍यांचे बटीक झाल्याचा घणाघाती वार राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

जिल्हा दुध संघातील अपहार आणि चोरीच्या विषयावरून आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार एकनाथराव खडसे यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शनिवारी भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आमदार खडसेंसह त्यांच्या परिवारावर आरोप केले. या आरोपांना आ. खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले. आ. खडसे म्हणाले की, जिल्हा दुध संघात झालेल्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल न करता मागील पाच वर्षातील व्यवहाराची माहिती पोलीस प्रशासनाने मागविली आहे. मुळात दुध संघाची चौकशी करण्याचा अधिकार सहकार विभागाला असतांना पोलिसांकडून संघाची छळवणूक सुरू आहे. पोलीस अधीक्षक प्रचंड दबावाखाली असल्याचा दावा त्यांनी केला. पोलिसांकडून ही चोरी दडपण्याचा प्रयत्न सुरू असून आरोपींना ते संरक्षण देत असल्याचेही आ. खडसे यांनी सांगितले.

कुठल्याही चौकशीला तयार

जिल्हा दुध उत्पादक संघात रूपयाचाही गैरव्यवहार असेल तर संबंधितांना जेलमध्ये टाका असे मी स्वत: सांगेल. राज्यात सरकार तुमचे आहे. त्यामुळे कुठल्याही एजन्सीकडून चौकशी करा, प्रत्येक चौकशीला आम्ही तयार असल्याचे आमदार खडसे यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेस जिल्हा दुध उत्पादक संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये उपस्थित होते.

दुध संघाच्या अपहारात खडसे परिवारासह टोळीचा सहभाग : आमदार मंगेश चव्हाण

जिल्हा दूध संघ अपहार प्रकरणात एकनाथ खडसे परिवारासह मोठ्या टोळीचा समावेश आहे. या टोळीचे प्रमुख एकनाथ खडसे आहेत. खडसेंचं पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन म्हणजे जेलमध्ये जाण्याचा सराव आहे. तसेच खडसेंनी सभासदांसमोर काय ते ङ्गदूध का दूध पानी का पानीफ करावे असे आव्हान भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना दिले आहे.

जिल्हा दूध संघ प्रकरणात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहे. जिल्हा दूध संघाच्या अपार प्रकरणात मोठी टोळी सक्रिय असून त्या टोळीचे प्रमुख एकनाथ खडसेच असल्याचा आरोप मंगेश चव्हाण यांनी केला आहे. दूध संघाच्या प्रकरणात मी सुरुवातीला जी तक्रार दिली आहे. ज्यांच्याविरुद्ध माझी तक्रार आहे तेच आंदोलन करतात आणि तेच पोलिसात फिर्याद देतात. या आश्चर्यकारक बाब असून एकनाथ खडसे आता बाहेर आहेत. मात्र ते जेलमध्ये जाण्याचा सराव करत असल्याचा टोला आमदार मंगेश चव्हाण यांनी लगावला आहे.

तर खडसेंनी राजीनामा द्यावा

आमदार चव्हाण म्हणाले, खडसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक जळगांव इथे यावे. सर्व दूध उत्पादक, दूध संघाचे सभासद सगळ्यांना बोलऊ, सगळे पुरावे मी त्यांना देतो, त्यांच्या काही शंका असतील तर त्यांनी मला विचाराव्यात, माझ्या काही शंका आहेत त्या मी विचारतो. त्यांनी सगळी समाधानकारक उत्तर दिली तर मी त्यांची जाहीर माफी मागतो. पण जर ते दोषी असतील तर त्यांनी तिथेच राजीनामा द्यावा. सर्व सभासदांसमोर काय ते मदूध का दूध पानी का पानीफ करावे, असे आव्हान त्यांनी दिले.

तुरुंगात जाण्याचा सराव

आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, या सिंडिकेटचे धागेदोरे कुठे कुठे जातात, काय काय जातात, हे सगळ्यांना माहित आहे. या सगळ्याला चेअरमनच जबाबदार आहेत. ही चोरी होऊच शकत नाही, तो अपहार आहे आणि तो चेअरमन आणि एमडी यांनीच केला आहे. त्यामुळेच तुरुंगात जाण्यापूर्वी त्यांनी तुरुंगाच्या बाहेर राहून तुरुंगात गेल्यावर कसे वाटते याची प्रॅक्टिस केली असल्याचही चव्हाण म्हणाले.

राजकारण तापले

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणुक लवकरच जाहीर होणार आहे. सद्यास्थिती राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय पॅनलची सत्ता आहे. जिल्ह्यातील भाजपा आणि शिंदेगट हा दूध संघ ताब्यात घेण्यासाठी कामाला लागला आहे. आगामी काळात होणार्‍या निवडणुकीपुर्वी भाजपा आणि आ.एकनाथराव खडसे यांच्यात दूध संघाच्या अपहारावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आठवडाभरापासून दूध संघाचे राजकारण चांगलेच तापत आहे. आता या लढाईत कोण जिंकतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *