Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याकरोनाची सौम्य लक्षणे आढळल्यास घरीच विलगीकरण

करोनाची सौम्य लक्षणे आढळल्यास घरीच विलगीकरण

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

करोनाचा संसर्ग वाढत असून ही साखळी तोडण्यासाठी शासनाकडून विविध पातळीवर काम सुरु आहे. शासनाने कोव्हिड रुग्णांवर उपचार व सुरक्षा याबाबत नवी तयार केली आहे. त्यानूसार करोनाची अती सौम्य, मध्यम व गंभीर या लक्षणानुसार रुग्णांचे वर्गीकरण केले जाणार आहे. सौम्य लक्षणे असल्यास रुग्णाला हॉस्पिटल अथवा क्वांरटाईन सेंटर ऐवजी घरीच विलगीकरण केले जाणार आहे.

- Advertisement -

करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून उपचारासाठी बेडची कमतरता भासण्याची शक्यता आहे. ते बघता गंभीर रुग्ण वगळता घरी करुन कसे उपचार देता येईल हा प्रयत्न सुरु आहे. कोविड केअर सेंटर, कोव्हिड हेल्थ सेंटर व हॉस्पिटल यात रुग्णांवर प्रामुख्याने उपचार होत आहे. ज्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळतील त्यांना रुग्णालयात नेण्याऐवजी त्यांच्या घरीच विलगीकरण केले जाईल. त्या ठिकाणी कुटुंबिय व इतरांशी संपर्क होता काम नये. मात्र करोना रुग्णाला एचआयव्ही, यासारखे आजार असेल तर घरात त्याचे विलगीकरण करता येणार नाही.

ज्येष्ठ नागरिकांना इतर आजार असतील तर त्यांची तपासणी केल्यावरच घरात विलगीकरणाची परवानगी दिली जाईल. विलगीकरण केलेल्या व्यक्तिची काळजी घेण्यासाठी पूर्णवेळ व्यक्ती असावी. काळजी घेणार्‍या व्यक्तिला हायड्रोक्सीक्लोरिन गोळी घेणे बंधनकारक आहे.

संबधितांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करुन त्यावर रुग्णाची माहिती बंधनकारक असेल. त्यावर रुग्णाच्या आरोग्याच्या स्थितीची माहिती द्यावी लागेल. जेणेकरुन आरोग्य अधिकार्‍यांना रुग्णाची माहिती मिळेल.

काळजीवाहकाने मास्क परिधान करावे.आजारी व्यक्तीने मास्कच्या पुढील भागास स्पर्श करु नये.जर मास्क स्राव सह ओला किंवा गलिच्छ झाला तर तो त्वरित बदलला जाणे आवश्यक आहे. वापरलेले मास्क टाकून द्यावे. हात वेळोवेळी करा. स्वत: चे तोंड, नाक किंवा तोंड स्पर्श करणे टाळावे. हात धुण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करावा. हात सुकविण्यासाठी डिस्पोजेबल कागदाच्या टॉवेल्सचा वापर करणे. हातमोजे काढण्यापूर्वी आणि नंतर हाताची स्वच्छता करा. रुग्णाला हाताळताना डिस्पोजेबल हातमोजे वापरा. रुग्णाचे भांडी, डिश, पेये, वापरलेले टॉवेल्स किंवा पलंगाचे कपडे याचा सामायिक वापर करु नये.

उपचारावेळी घ्यावयाची काळजी छातीत सतत वेदना, अशक्तपणा किंवा सुन्नपणा,चेहरा निळा पडणे व इतर लक्षणांवर बारकाईने नजर घरगुती विलगीकरण असलेल्या रुग्णाच्या आरोग्याची स्थितीची प्रत्यक्ष घरी जाऊन तपासणी करावी. दररोज रुग्णाच्या आरोग्याचा अहवालाची नोंद ठेवावी. शरीराचे तापमान, नाडी दर, ऑक्सिजन घेताना त्रास होत नाही ना याची काळजी घेणे. कोविड -1 पोर्टलवर आणि घरात विलगीकरण असलेल्या रूग्णांविषयी तपशील अद्यावत केला पाहिजे. गंभीर परिस्थितीत उपचारासाठी आवश्यक असल्यास रुग्णाला स्थलांतरित यंत्रणा स्थापित केली जावी. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आणि संपर्कातील व्यक्तिंचे प्रोटोकॉलनुसार परीक्षण केले जाईल. अलगीकरण असलेल्या रुग्णाला उपचारातून मुक्त करताना फिटनेस प्रमाणपत्र देण्यासह डिस्चार्ज मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जावे.

घरात विलगीकरण असलेल्या रुग्णाला लक्षण सुरू झाल्यापासून 10 दिवसानंतर डिस्चार्ज करावे लागेल. त्यानंतर, रुग्णाला घरी एकटे आणि त्यांच्या आरोग्याची पुढील 7 दिवस देखरेख करण्याचा सल्ला देण्यात येईल. घरात विलगीकरण संपल्यानंतर चाचणी घेण्याची आवश्यकता नाही.

शहरात आणि जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्स मध्ये दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. बाधित रुग्ण संख्या याच वेगाने वाढत राहिली तर एवढ्या रुग्णांना उपचारांसाठी दाखल करून घेण्याचे मोठे आव्हान प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढे निर्माण होणार आहे. लक्षणे नसलेल्या परंतु अहवाल आलेल्या रुग्णांना हॉस्पिटल मध्ये दाखल न करता घरीच उपचार देण्याच्या निर्देशांचे पालन शहर आणि जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून होते आहे. परंतु त्याच बरोबर आता अत्यल्प लक्षणे आढळून येणार्‍या रुग्णांनाही घरीच उपचार देता येतील असे निर्देश प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.

करोनाची लक्षणे तपासून सबंधीत नागरीक कोणत्या भागातील आहे त्यानुसार त्यास करून घेतले जात आहे. जिल्हा रूग्णालयात प्रामुख्याने जोखमीच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार अती सौम्य लक्षणे असणार्‍या व सर्व अटी शर्तींचे पाल करणार्‍या रूग्णांना त्यांच्या घरीच उपचारास प्रतिज्ञापत्र सादर करून परवानगी देण्यात येणार आहे. तसेच सबंधीत रूग्णास आरोग्याबाबत मदत लागल्यास जिल्हा रूग्णालयातून तातडीची मदत देण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या