पेठ,त्र्यंबकेश्वर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के

पेठ,त्र्यंबकेश्वर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यातील पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. पेठ तालुक्यात खरपडी,नाचलोंढी,धान पाड़ा परिसरात तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणपाडा खैरपल्ली या गावात मध्यरात्री भुकंपाचे २ सौम्य धक्के जाणवले.

२१ जुलै २०२२ च्या रात्री ११ : ०२ : २९ या वेळेत नाशिक पासून ४० किमीच्या क्षेत्रात २ : ०४ क्षमतेचा पहिला धक्का जाणवला . जमीनीतून आवाजा बरोबरच कंप जाणवला तर दुसरा धक्का १२ : ३० : ५० वाजता ३ रिस्टर क्षमतेचा धक्का जाणवला सदर धक्क्याची नोंद मेरीच्या भुकंपमापक यंत्रावर नोंदली गेली .

सततच्या पावसामुळे जमीन खचण्याच्या प्रकारा बरोबरच भुकंप सदृश्य प्रकारामुळे काहीसे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .लोकांनी घाबरून जाऊ नये सुरक्षित ठिकाणी आसारा घ्यावा तसेच काही घटना घडल्यास तातडीने कळवावे असे आवाहन प्रशासना कडून करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com