राजस्थानमध्ये मिग-२१ विमान कोसळले

राजस्थानमध्ये मिग-२१ विमान कोसळले

भारतीय हवाईदलाचे एक मिग -२१ विमान राजस्थान मधील बाडमेर जिल्ह्यात रात्री नऊ वाजेच्या दरम्यान कोसळले.

ही दुर्घटना घडली तेव्हा मिग २१ विमानाचे तुकडे अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत विखुरले गेले.

मिग २१ विमान जेथे कोसळले तेथे मोठा खड्डा झाला असल्याचे समजते. सदर विमानात दोन वैमानिक असल्याची माहिती मिळाली.विमानात असलेल्या दोन्ही वैमानिकांचा शोध सुरु आहे.

या घटनेची माहिती होताच येथील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com