MHT CET Result 2023 : एमएचटी-सीईटीचा निकाल १२ जूनला, कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या

MHT CET Result 2023 : एमएचटी-सीईटीचा निकाल १२ जूनला, कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या

मुंबई | Mumbai

राज्यातील अभियांत्रिकी, कृषि, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (MHT CET Result 2023) निकाल १२ जूनला सकाळी अकरा वाजता जाहीर करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४साठी विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने जूनपासून राबवण्यात येणार आहे.

प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार असून प्रथमच मोबाईल अॅपमार्फत उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत विविध टप्प्यांची माहिती तसेच सूचना आणि जागा वाटप आदी माहिती अॅपच्या माध्यमातून उमेदवारांना मिळणार आहे. मोबाईल अॅपचा विद्यार्थी पालक यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

प्रवेश प्रक्रिया राबविताना अॅप्लीकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे. सदर API द्वारे बारावी गुण, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलीअर प्रमाणपत्र, कृषी शिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीत लागणारा सात-बारा उतारा. प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक प्रमाणपत्र दाखले यांची पडताळणी करण्यात येणार आहे.

कसा पहाल निकाल?

  • cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा.

  • MHT CET Result 2023 Direct Link चा पर्याय शोधा.

  • त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर लॉगिन पेज ओपन होईल.

  • Maharashtra CET Result 2023 तुमच्या स्क्रिन वर दिसेल.

  • आता तुम्हांला निकाल पाहता येईल. हा निकाल डाऊनलोड करून त्याची प्रिंट देखील काढता येणार आहे.

राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) एमएचटी सीईटी ९ ते २१ मे या कालावधीत घेण्यात आली. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ग्रुपची (पीसीएम) परीक्षा ९ ते १३ मे दरम्यान घेण्यात आली होती. तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ग्रुपची (पीसीबी) परीक्षा १५ ते २० मे या कालावधीत पार पडली होती. पीसीएम आणि पीसीबीच्या परीक्षा दोन सत्रांत घेतल्या होत्या. पहिल्या सत्राची परीक्षा सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुसऱ्या सत्राची परीक्षा दुपारी २ ते ५ या वेळेत झाली होती.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com