Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रMHADA exams| म्हाडा पेपरफुटी प्रकरणात परीक्षा घेणाऱ्या संस्थेचा मालकच

MHADA exams| म्हाडा पेपरफुटी प्रकरणात परीक्षा घेणाऱ्या संस्थेचा मालकच

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी आज परीक्षा (Exams) होणार होती. परंतु परीक्षेचा पेपर फोडण्यात आल्यामुळे परीक्षा रद्द झाली. याप्रकरणी (MHADA Exam) पुण्यात तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलिसांनी ही कारवाई केली.

या फोटोंनी सोनाली कुलकर्णीचे खुललं सौंदर्य

- Advertisement -

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘मिळालेल्या माहितीच्या आधारे सायबर क्राईम विभागाचे पथके तयार करून त्यांना औरंगाबाद, जालना, बीड, पुणे, ठाणे परिसरामध्ये पाठवून संशयिताना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. औरंगाबाद परिसरातील परीक्षार्थींशी संपर्क साधून त्यांच्याकडून आर्थिक फायदा मिळवून परीक्षेच्या पूर्वी पेपर फोडून त्यांना देण्याची योजना टार्गेट करिअर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडमीचे संचालक कृष्णा जाधव आणि इतरांनी आखल्याची माहिती समोर आली’, अशी माहिती पोलीस आयुक्त गुप्ता यांनी दिली.

हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

दोघांना घेतले ताब्यात

पोलीस पथकाने टार्गेट करिअर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडमीचे संचालक कृष्णा जाधव आणि त्यांचे सहकारी अंकित चनखोरे यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे MHADA च्या परीक्षेसाठी बसणाऱ्या 3 परीक्षार्थ्यांची प्रवेश पत्रे, त्यांची मूळ शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, कोरे धनादेश व आरोग्य विभागाच्या ‘क’ वर्गासाठी बसलेल्या 16 आणि ‘ड’ वर्गासाठी बसलेल्या 35 परीक्षार्थ्यांच्या नावाच्या याद्या, प्रवेश पत्रांच्या प्रती आढळून आल्या, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

परीक्षा घेणाऱ्याचा ‘पेपरफुटीच्या रॅकेट’मध्ये

पोलिसांनी संशयितांच्या हालचालीचा मागोवा घेऊन पुणे व ठाणे परिसरामध्ये नेमलेल्या पथकांनी संशयित संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांच्या हालचालीचा मागोवा घेतला. त्यांना त्यांच्या Creta गाडीमधून (क्रमांक MH20 /EL 7111) ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यासोबत गाडीमध्ये प्रितीश देशमुख आढळून आले. डॉ. प्रितीश देशमुख हे G.A.software या कंपनीचे संचालक असून, त्यांच्या संस्थेतर्फे MHADA च्या लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत.

हे आहेत आरोपी

संशयित आरोपी अंकुश रामभाऊ हरकळ (रा. किनगाव राजा, ता. सिंधखेडराजा, जि. बुलढाणा), संतोष लक्ष्मण हरकळ (रा. सदर सद्या, रा. मिलेनियम पार्क, औरंगाबाद) आणि डॉ. प्रितीश देशमुख (संचालक, G.A.software, रा. महिंद्रा अॅन्थिया, खराळवाडी, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या