Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामेट्रो, नाशिक-पुणे रेल्वेमार्ग अंतिम मान्यतेच्या प्रतीक्षेतच

मेट्रो, नाशिक-पुणे रेल्वेमार्ग अंतिम मान्यतेच्या प्रतीक्षेतच

दे.कॅम्प। वार्ताहर Deolali Camp

नाशिक शहरासाठी निओ मेट्रो प्रकल्प NEO Metro Project महत्वाचा आहे.मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात केंद्रांने निओ मेट्रोची घोषणा केली होती.या प्रकल्पासाठी राज्यशासनाने आपल्या वीस टक्के हिस्याला मान्यता दिलेली असून इक्विटी मधुन 60 टक्के निधीला मंजुरी मिळालेली आहे. वर्षाभरापुर्वीच्या अर्थसंकल्पात Budget – 2022 घोषणा होऊनही नव्या अर्थसंकल्पात निओ मेट्रो प्रकल्पाला अंतिम मान्यता मिळाली नाही.त्यामुळे पुन्हा प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नसल्याची भावना खा हेमंत गोडसे यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

नाशिक जिल्हयाच्या सर्वागिण विकासासाठी नाशिक – पुणे रेल्वेलाईन प्रकल्प Nashik – Pune Railway खुपच महत्वाचा आहे.याप्रकल्पासाठी राज्यशासनाने आपल्या हिस्याच्या 20 टक्के म्हणजेच बत्तीशे कोटी रूपयांच्या निधीला यापुर्वीच मान्यता दिलेली असून इक्विटी मधून साठ टक्के निधीला मंजुरी मिळालेली आहे . मात्र केंद्राच्या हिस्याच्या 20 टक्के निधीचा विषय प्रलंबित असून नाशिककर नाशिक – पुणे रेल्वेमार्गाच्या अंतिम मान्यतेच्या प्रतिक्षेत कायम आहेत.

केंद्राने पाच वर्षांपूर्वी 2022 पर्यंत शेतकर्‍यांच्या शेतीमालाचे उत्पन्न दुप्पटहोईल,शेतीमालाला वाढीव भावही मिळेल असे ठोस आश्वासन दिले होते.अलीकडे शेतक – यांचा उत्पन्न खर्च वाढला.मात्र आजच्याही अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा केंद्राने शेतक – यांच्या हितासाठी केली नसून शेतक – यांना वार्‍यावर सोडले आहे.

अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरणालाही फारसे महत्व दिले गेले नाही.कोरोना काळात बेरोजगारी मोठया प्रमाणात वाढलेली असून वाढलेल्या बेरोजगारीच्या तुलनेने केंद्राने आजच्या अर्थसंकल्पामध्ये खुपच तोकडे नियोजन केल्याचे दिसत आहे. करदात्यांना काहीसा दिलासा देण्याच्या प्रयत्न केला असला तरी शेतकरी , बेरोजगारी आणि महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात केंद्राने हात खुपच आखडता घेतल्याची प्रतिक्रिया खा . हेमंत गोडसे यांनी आजच्या अर्थसंकल्पाविषयी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या