Monday, April 29, 2024
Homeदेश विदेशमेट्रो मॅन श्रीधरन भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

मेट्रो मॅन श्रीधरन भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

केरळ

स्वच्छ चारित्र्याच्या अधिकारी म्हणून ओळख असलेले मेट्रो मॅन ई. श्रीधरन भारतीय जनता पक्षाकडून केरळच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. केरळ भाजपचे प्रमुख के. सुंदरन् यांनी मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून भाजपकडून ई. श्रीधरन् यांच्या नावाची घोषणा केली आहे.

- Advertisement -

ई. श्रीधरन दोन आठवड्यांपूर्वीच भाजपमध्ये सामील झाले होते. त्यांची प्रतिमा एक स्वच्छ चारित्र्याच्या अधिकारी म्हणून राहिली आहे. १४० सदस्यीय केरळ विधानसभेच्या येत्या ६ एप्रिलपासून निवडणुका होणार आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केलेले व मेट्रो मॅन ई. श्रीधरन हे केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. केरळमध्ये भाजपाची सत्ता आणणं हे आपलं मुख्य उद्दीष्ट असून पक्षाने राज्यात यश मिळवल्यास मी मुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार असेन असं श्रीधरन भाजपात प्रवेश करण्या अगोदरच म्हणाले होते.

दिल्लीमध्ये मेट्रो ट्रेन सुरु करण्याचे श्रेय ई. श्रीधरन यांनाच जातं. देशात फ्रँट कॉरिडॉर सुरु करण्याचे श्रेय त्यांनाच जातं. याशिवाय त्यांनी कोच्ची मेट्रो आणि लखनऊ मेट्रो प्रोजेक्टचंही काम केलं आहे. ८८ वर्षीय ई. श्रीधरन १९९५ पासून २०१२ पर्यंत दिल्ली मेट्रोचे मॅनेजिंग डायरेक्टर राहिलेले आहेत. ते माता वैष्णो देवी तीर्थ ट्रस्टचे सदस्य देखील आहेत. त्यांना २००१ मध्ये पद्म आणि २००८ मध्ये पद्म विभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाइम मॅगझीनने त्यांना एशिया हीरो म्हणून देखील नावाजलं आहे. केरळच्या पलक्कडमध्ये श्रीधरन यांचा जन्म १२ जून १९३१ रोजी झाला. त्यांनी आंध्र प्रदेशातील काकीनाडामधून सिव्हील इंजिनिअरिंगची डिग्री प्राप्त केली आहे. त्यानंतर ते भारतीय रेल्वे सेवेमध्ये आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या