Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याWeather Updates : देशातील 'या' राज्यांमध्ये उष्णतेची लाट

Weather Updates : देशातील ‘या’ राज्यांमध्ये उष्णतेची लाट

मुंबई | Mumbai

राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून (Heat) काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या आठवड्यात वाढत्या उन्हामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रासह देशातील बहुतांश शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा हवामान विभागाने दिला आहे….

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात (Maharashtra) कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून राज्यातील अनेक भागात पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तविला आहे.

तसेच देशातील बहुतांश भागात ४० अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. तर आज रविवार (१४ मे) दिल्लीत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून त्याठिकाणी ढगाळ वातावरणासह जोरदार वादळी आणि रिमझिम पावसाची (Rain) शक्यता आहे.

दरम्यान, देशातील उत्तराखंड येथील उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, चमोली, बागेश्वर आणि पिथौरागढ जिल्ह्याच्या काही ठिकाणी आणि उर्वरित डोंगराळ भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच आसाम, नागालँड, मणिपूर, ओडीसा, पश्चिम बंगाल, राजस्थानमधील अनेक भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर त्रिपुरा आणि मिझोरममध्ये पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या