Maharashtra Rain Update : राज्यात पुन्हा पाऊस कधी बरसणार? हवामान विभागाने वर्तविला 'हा' अंदाज, वाचा सविस्तर

Maharashtra Rain Update : राज्यात पुन्हा पाऊस कधी बरसणार? हवामान विभागाने वर्तविला 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Sandip Tirthpurikar

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी (Farmer) संकटात सापडला आहे. तसेच राज्यात समाधानकारक पाऊस (Rain) न झाल्याने बऱ्याच भागात पाणीटंचाई निर्माण झाली असून जनतेसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अशातच आता हवामान विभागाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पाऊस कोसळणार असल्याची माहिती दिली आहे...

Maharashtra Rain Update : राज्यात पुन्हा पाऊस कधी बरसणार? हवामान विभागाने वर्तविला 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
धार्मिक नगरीचे रुपांतर होतंय ‘क्राईम सिटी’त; वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीती

याबाबत हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, आजपासून म्हणजेच २९ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या दरम्यान राज्यभरात हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत. तर पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात (Maharashtra) पुढील चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला असून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

तसेच मुंबईमध्ये (Mumbai) मागील दोन दिवसांपासून पावसाला सुरूवात झाली असून सोमवारी आणि मंगळवारी पहाटेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांची उष्णतेपासून सुटका झाली आहे. तसेच ढगाळ वातावरण असल्यामुळे मंगळवार (दि.२९) रोजी संपूर्ण मुंबईत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कमी प्रमाणात पाऊस होईल, असा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Maharashtra Rain Update : राज्यात पुन्हा पाऊस कधी बरसणार? हवामान विभागाने वर्तविला 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
'मी अजून दारूला ...; द्राक्ष बागायत संघाच्या परिषदेत अजित पवारांची तुफान टोलेबाजी

दुसरीकडे हवामान विभागाने ५ किंवा ८ ऑक्टोबरपासून मान्सूनचा (Monsoon) परतीचा प्रवास सुरु होणार असल्याचे म्हटले आहे. तर यंदा राज्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने दुष्काळ (Drought) पडण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

Maharashtra Rain Update : राज्यात पुन्हा पाऊस कधी बरसणार? हवामान विभागाने वर्तविला 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Nashik News : जनतेच्या हिताच्या विकासासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे - पालकमंत्री भुसे

दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांत गेल्या पाच वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत ६० टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरच्या संख्येबाबत केंद्र सरकारकडून आढावा घेण्यात आला आहे. तसेच ऑगस्ट महिन्याचा विचार केला असता राज्यात सरासरीच्या फक्त ४२ टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये सर्वात विदारक परिस्थिती मराठवाड्यात आहेत. कारण याठिकाणी सरासरीच्या केवळ २८ टक्के पाऊस झाला आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात केवळ ३६ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे राज्यातील १५ जिल्ह्यांत पावसाच्या सरासरीतली तूट मोठी आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com