Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यामान्सून केरळात कधी दाखल होणार? हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

मान्सून केरळात कधी दाखल होणार? हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

पुणे | Pune

अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास लांबला आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सून दाखल होण्याची तारीख लांबतच चालली आहे. आता मान्सूनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे…

- Advertisement -

मान्सून येत्या 24 ते 48 तासांत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सर्वसाधारणपणे 4 जूनच्या दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र अरबी समुद्रावर तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनची गती मंदावली होती.

आता मात्र मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या 24 ते 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल. मान्सूनचा पुढील प्रवास मात्र वातावरणाच्या अनुकूलतेवर अवलंबून असणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

तब्बल १६ हजार जणांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरचा दुर्दैवी अंत

दरम्यान मुंबईसह कोकण, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी शुक्रवार दि.९ जूनपासुन पुढील ३ दिवस म्हणजेच सोमवार दि.१२ जूनपर्यंत मध्यम पावसाची शक्यता जाणवत असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेचे निवृत्त हवामान तद्य माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यानच्या काळात मराठवाडा विदर्भात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते, असेदेखील त्यांनी म्हटले आहे.

Nashik Crime : फुगे विक्रेत्याचा चाकूने भोसकून खून

- Advertisment -

ताज्या बातम्या