अकरावी प्रवेशासाठी आज गुणवत्ता यादी

अकरावी प्रवेशासाठी आज गुणवत्ता यादी

मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरातील अकरावी प्रवेश प्रक्रियेची (( Eleventh Std Admission Process ) )दुसरी फेरी ( Second Round ) बुधवारपासून सुरू झाली असून या पहिल्या फेरीत ज्या विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरून प्रक्रियेत सहभागी होता आले नाही. अथवा प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळू शकले नाही. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने ऑप्शन फॉर्म भरण्याची संधी या फेरीत मिळणार आहे.

दुसऱ्या फेरीसाठी आज शनिवारी (दि. ४) गुणवत्ता यादी ( Merit list )जाहीर केली जाणार आहे. यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सोमवार दि. ६ पर्यंत मुदत असेल. अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत अर्ज करून न शकेलल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जाचा भाग एक भरून त्यांची पडताळणी करण्यासोबतच अर्जाच्या भाग दोनचा ऑप्शन फॉर्म भरून अर्ज निश्चित करावा लागणार आहे.

अशी होईल प्रवेशाची दुसरी फेरी

४ सप्टेंबर : दुसरी गुणवत्ता यादी होईल जाहीर.

४ ते ६ सप्टेंबर : यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत.

६ सप्टेंबर : दुसऱ्या फेरीनंतर महाविद्यालयांतील रिक्त जागांचा तपशील होईल जाहीर.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com