Monday, April 29, 2024
Homeनाशिकगारठा वाढला; नाशिक, निफाडचा पारा घसरला

गारठा वाढला; नाशिक, निफाडचा पारा घसरला

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आज सकाळी नाशिक शहरात (Nashik City) व निफाडमध्ये पारा (Mercury down in Niphad) घसरल्याने गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. निफाडमध्ये नीचांकी 11 अंश सेल्सिअसवर पारा खाली आला तर नाशिकचा पारा 12.2 अंश सेल्सिअसवर आल्यामुळे अनेकजण आज सकाळी स्वेटर परिधान करूनच घराबाहेर पडल्याचे दिसून आले…

- Advertisement -

गेल्या आठवड्यात शनिवारी (last week saturday and sunday) आणि रविवारी तपमानाचा पारा अचानक वाढून २० अंशांपर्यंत गेला होता. यानंतर सोमवार पासून तपमानात काहीही घट होताना दिसून आली. यानंतर कमाल तपमानही कमी झाल्याने वातावरणातील उकाडा कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

निफाडमध्ये कुंदेवाडी (Kundewadi) येथील गहू संशोधन (regional Wheat Research Center) केंद्रावरील नोंदीत दरवर्षी दवबिंदू गोठेपर्यंत पारा खाली येताना दिसून येतो. या हंगामातील सर्वात कमी तपमान काल आणि आज निफाडमध्ये नोंदवले गेले आहे.

या हंगामातील नीचांकी तपमानाची नोंद निफाडमध्ये नोंदवली गेली असून ११.५ अंश सेल्सियस पारा खाली आला आहे. नाशिक शहराच्याही तपमानात घट झाल्यामुळे गुलाबी थंडीची चाहूल लागली असून व्यायामप्रेमी पुन्हा एकदा संकल्प करून रस्त्यावर धावताना, फेरफटका मारताना नजरेस पडू लागले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या