Monday, April 29, 2024
Homeक्रीडाvideo पंतप्रधान मोदींचा हॉकी टीमला फोन, म्हणाले...

video पंतप्रधान मोदींचा हॉकी टीमला फोन, म्हणाले…

नवी दिल्ली:

तब्बल ४१ वर्षांनंतर भारताची हॉकीमधली (Hockey Team) पदकाची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. भारतीय पुरुष संघाने (Hockey Team)जर्मनीवर मात करत कांस्य पदक मिळवले आणि १९८० पासून हॉकीत असलेला पदकाचा दुष्काळ संपला. यापुर्वी मॉस्कोमध्ये १९८० साली भारताने पदक जिंकलं होतं. भारतीय संघाचे हे यश आज अवघा देश साजरं करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi )यांनी या विजयी संघाला स्वत: फोन करुन त्यांच्याशी बातचीत केली आणि त्यांचं प्रचंड कौतुक केलं.

- Advertisement -

Tokyo 2020 Hockey : भारतीय हॉकी संघाने घडवला इतिहास; देशभरात जल्लोष, पाहा व्हिडिओ

काय म्हणाले पंतप्रधान

भारतीय हॉकी संघाचे कर्णधार मनप्रीत सिंग (Manpreet Singh), प्रशिक्षक ग्राहम रीड व सहायक कोच पीयूष दुबे (Piyush Dubey) यांच्यांशी मोदींनी ( PM Modi) संवाद साधला. सुरुवातील कर्णधार मनप्रीत (Manpreet Singh) यांच्यांशी पंतप्रधान बोलले. त्यांनी मोबाईल स्पिकरवर केला होता. पंतप्रधान म्हणाले, ‘तुम्ही जबरदस्त काम केलंय, संपूर्ण देश नाचतो आहे. तुमच्या लोकांची मेहनत कामी आली आहे. पियुषजींनी देखील खूप मेहनत केली. सर्व खेळाडूंना शुभेच्छा देणं हे माझं कर्तव्य आहे. आपण १५ ऑगस्टला भेटणार आहोत मी तुम्हा सर्वांना बोलावलं आहे. पियुषजी आहेत का तिथे?’

‘पियुषजी खूप-खूप शुभेच्छा… संपूर्ण देशाला तुमचा गौरव वाटत आहे.’

‘ग्रॅहम जी.. अभिनंदन.. तुम्ही इतिहास घडवला आहेत. माझ्या तुम्हाला खूप शुभेच्छा.. तुम्ही जी कठोर मेहनत केली त्याचं हे यश आहे. त्यातूनच हे यश आपल्याला पाहायला मिळतं आहे. आम्हाला तुमचा अभिमान वाटतोय. धन्यवाद.’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं कौतुक केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi )भारतीय संघाचं अभिनंदन करणारं ट्वीट करून म्हटलं आहे की, ऐतिहासिक! हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात राहिल. कांस्य पदक मिळविल्याबद्दल आपल्या पुरुष हॉकी संघाचं अभिनंदन. या यशानं आपल्या देशातील तरुणांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. भारताला आपल्या हॉकी संघावर गर्व आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या