नाशिकच्या 'या' प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक

नाशिकच्या 'या' प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरात (nashik city) ठाकरे गटातून (Thackeray group) शिंदे गटात (Shinde group) इनकमिंग वाढल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनीही नाशिकचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले आहे.

त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) यांना विशेष परिषदेसाठी पाचारण करण्यात आले असून, त्यामुळे शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

नोकरभरतीसह (recruitment) विविध प्रश्न आणि शासकीय योजनांतर्गत हाती घेण्यात येणार्‍या प्रकल्पांविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली येत्या बुधवारी (दि. 11) सकाळी साडेनऊ वाजता मुंबईतील (mumbai) सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांची (Municipal Commissioner) परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यात पुलकुंडवारही सहभागी होणार आहेत.

एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर शहरांच्या नियोजनबद्ध विकासाकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. विशेषतः नाशिक शहराकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे. त्यामुळे त्यांनी नाशिकच्या (nashik) प्रश्नांसंदर्भात मुंबईत नोव्हेंबरमध्ये बैठकही घेतली होती. त्यावेळी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासह (Simhastha Kumbh Mela) विविध विषयांसंदर्भात त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्व आले आहे.

शहरातील भरतीप्रक्रियेबाबत केलेली कार्यवाही, शहर सौंदर्यीकरणाबाबत (City beautification) केलेली कार्यवाही, रुग्णालये (hospitals), शाळांच्या (schools) अद्ययावतीकरणासाठी केलेले प्रयत्न, उत्पन्नवाढीसाठी केलेले प्रयत्न, केंद्र शासनपुरस्कृत आवास योजना, अमृत दोनमधील योजना, स्वच्छ महाराष्ट्र अभियान आदी मुद्यांवर यावेळी चर्चा होण्याची आपेक्षा आहे.

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व महापालिकांचे आयुक्त, अ वर्ग नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांची परिषद बोलावलीअसल्याने शहराच्या विकासाला पून्हा गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com