केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची आज बैठक

बारावी बोर्ड आणि अन्य प्रवेश परीक्षांसंदर्भात चर्चा केली जाणार
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची आज बैठक
USER

नवी दिल्ली । प्रतिनिधी

केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी रविवारी 23 मे 2021 रोजी एक बैठक बोलावली आहे.

या बैठकीत बारावी बोर्ड आणि अन्य प्रवेश परीक्षांसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. देशभरच्या सर्व राज्यांतील आणि केंद्र शासित प्रदेशांतील शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव आणि राज्यातील परीक्षा मंडळांचे अध्यक्ष आणि संबंधित घटकांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

ही व्हर्च्युअल मीटिंग आज दुपारी 23 मे रोजी सकाळी 11.30 वाजता होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असणार आहेत.या संबंधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी एक ट्विट देखील केले आहे.

यानुसार, राज्य सरकारच्या सर्व शिक्षणमंत्र्यांना आणि सचिवांना या बैठकीत सहभागी होण्यासाठी आणि आगामी परीक्षांसंबंधी आपली मते, विचार नोंदवण्याचे आवाहन केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com