Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यापर्यावरण संवर्धन कार्यदलाची आज सभा

पर्यावरण संवर्धन कार्यदलाची आज सभा

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यातील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी गठित करण्यात आलेली कार्यदलाची प्रथम सभा 10 जून रोजी सकाळी 11 वाजता मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीस जिल्ह्यातील पर्यावरण क्षेत्रात काम करणारी व्यक्ती, संस्था यांना निमंत्रित करण्यात येत असून,त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

- Advertisement -

या संदर्भात जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील यांनी काढलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, नाशिक जिल्ह्यातील सुरु असलेल्या विविध प्रकारच्या विकासकामांसाठी दगड, माती, मुरुम, खडी इत्यादी गौण खनिजाची आवश्यकता भासते. जे गट जिल्हा खाणकाम योजनेत समाविष्ट केलेले आहेत.

अशा गटातून इतर कायदेशीर बाबींची पूर्तता होत असल्यास उत्खननाची परवानगी देण्यात येते. अशा उत्खननाबाबत काही प्रकरणात अनधिकृत उत्खननाबाबत जनतेच्या तसेच पर्यावरण क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्ती,संस्था यांच्या तक्रारी प्राप्त होत असतात. या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी कार्यदलाची स्थापना करण्यात आली असल्याचे पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

विकासकामांसाठी गौणखनिज आवश्यक असले तरी पर्यावरणदृष्टया संवेदनशील अशा डोंगर, रांगा,जंगले,गड/किल्ले इत्यादी ठिकाणी उत्खनन होऊ न देता पर्यावरण संतुलन राखत समतोल व स्थायी विकास साधणे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यावरण क्षेत्रात काम करणारे व्यक्ती, संस्था यांनी बैठकीस उपस्थित रहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या