Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रजाणून घ्या, मुख्यमंत्र्यांसोबतच्या टास्क फोर्सच्या बैठकीत काय झाले?

जाणून घ्या, मुख्यमंत्र्यांसोबतच्या टास्क फोर्सच्या बैठकीत काय झाले?

मुंबई :

राज्यातील (Maharashtra )अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या ही आटोक्यात आली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत आहे त्यामुळे राज्यातील निर्बंध शिथिल (restrictions relaxation) करण्याची मागणी होत आहे. या संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आरोग्य विभाग आणि टास्क फोर्स (Task Force)सोबत बैठक घेतली. या बैठकीत टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर आपले मतं मांडले आहे.

- Advertisement -

HSC Result : बारावीचा निकाल या तारखेला लागणार कारण…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोरोना टास्क फोर्सची बैठक आज पार पडली. या बैठकीत मुंबई लोकलसह राज्यातील कोरोना निर्बंधांबाबतही चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. या बैठकीत राज्यातील रुग्णसंख्येचा येत्या 15 तारखेपर्यंत आढावा घेऊन निर्णय घ्यावा असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टास्क फोर्समधील तज्ज्ञ समितीतील काही डॉक्टरांनी आपले मत नोंदवत म्हटलं की हळूहळू निर्बंध शिथिल करण्यात यावे. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या अधिक आहे तेथे शिथिलता नको असेही मत या डॉक्टरांनी मांडले आहे. यासोबतच 15 ऑगस्टपर्यंत सर्व अंदाज घ्या आणि त्यानंतर संपूर्ण मूभा द्यायची की नाही या संदर्भातील विचार करा असंही टास्क फोर्समधील काही डॉक्टरांनी म्हटलं आहे. यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

मॉल, दुकानांना शिथिलता मिळणार?

दुसरीकडे मॉल, दुकाने यांना शिथिलता द्यावी. मात्र, त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लसीचे दोन डोस बंधनकारक करण्यात यावे, असंही टास्क फोर्सने म्हटलं आहे. या बैठकीत तज्ज्ञ डॉक्टरांनी ज्या ठिकाणी रुग्णसंख्या जास्त आहे तिथे शिथिलता नको. साधारण 15 ऑगस्टपर्यंत सर्व अंदाज घेत इतर ठिकाणी संपूर्ण मूभा देण्याचा विचार करावा, असं मतही या बैठकीत मांडण्यात आलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या