
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिककरांना हवी असलेली तसेच अनेक वर्षापासून वाट पाहत असलेल्या निओ मेट्रो प्रकल्पासंदर्भात (Neo Metro Project) दिल्लीत (delhi) आज विशेष बैठक बोलावली होती.
यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner and Administrator Dr. Chandrakant Pulkundwar) गेले आहे. दरम्यान सादरीकरणासह बैठक सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी नाशिक दौऱ्यावर असताना याबाबत आश्वासन दिले होते. त्यांच्या आश्वासनानंतर अवघ्या चारच दिवसांत दिल्लीत बैठक झाली.
निओ मेट्रोसाठी (Neo Metro) सुरूवातीला दोन एलिव्हेटेड कॉरिडोर (Elevated corridor) उभारले जाणार आहे. पहिला एलिव्हेटेड कॉरिडोर १० कि.मी. लांबीचा राहणार असून त्यात गंगापूर, जलालपूर, गणपतनगर, काळेनगर, जेहान सर्कल, थतेनगर, शिवाजी नगर, पंचवटी, सीबीएस, मुंबई नाका अशी दहा स्थानकं असतील.
दुसरा कॉरिडोर गंगापूर (gangapur) ते नाशिकरोड (nashik road) असा २२ कि.मी. लांबीचा असून त्यात गंगापूर गाव, शिवाजी नगर, श्रमिक नगर, एमआयडीसी, मायको सर्कल, सीबीएस, सारडा कॉर्नर, द्वारका, गांधी नगर, नेहरू नगर, दत्त मंदिर, नाशिक रोड अशी स्थानकं असतील. सीबीएस कॉमन स्टेशन असून, या टायरबेस मेट्रोसाठी एकूण २९ स्टेशन असणार आहे.
याशिवाय दोन फिडर कॉरिडोर (Feeder Corridor) असतील. त्यापैकी एक सातपूर कॉलनी, गरवारे, मुंबई नाका दरम्यान चालेल तर दुसरा नाशिकरोड, नांदूरनाका, शिवाजीनगर दरम्यान चालणार आहे. या प्रकल्पासाठी महारेल आणि सिडकोच्या माध्यमातून सर्वेक्षण (Survey) करून मेट्रो निओची दोन टप्प्यांतील मार्गिका, स्थानके, शेडसाठीची जागाही निश्चित करण्यात आली होती.
२०२० च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मेट्रोसाठी २०२४ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. त्यानंतर हा प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीच्या पटलावर असल्याचे कारण देत फक्त हिरवा झेंडा दाखवणेच बाकी असल्याचे सांगितले जात होते. केंद्रातील मंत्रीही नाशकात येऊन यासंदर्भात निओ मेट्रो लवकरच होईल, असे सांगत होते. मात्र, प्रकल्प कधी सुरू होणार, हे स्पष्ट होत नव्हते. तर फडणवीस यांनी शनिवारी (दि.११) भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत देशासाठी एकसमान मेट्रोचे मॉड्युल लागू होणार असल्याचे स्पष्ट केले होते.