
मुंबई | प्रतिनिधी Mumbai
इंधन दरवाढीनंतर (Fuel rate hike) आता मेडिकल मधील औषधे (Medicine rate increased) तब्बल १५ ते ४० टक्के महागल्याने आधीच महागाईच्या फेऱ्यात अडकलेल्या नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागली आहे. (15 to 40 percent inflation)
झेंडू बाम (Zendu balm) आणि डेटोलचीही (dettol antiseptic liquid) किंमत आता वाढणार आहे. तर हृदयरोग (heart disease), मधुमेह (diabetes disease), रक्तदाबावरील औषधांच्या (bloos presser) किमती 15 ते 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
तर दुसरीकडे टॉनिक (Tonic), एन्टिबायोटिक्स (antibiotics) औषधांबरोबरच खोकल्याची औषधेही महागली आहेत.
करोनामुळे औषधे बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि रसायनांच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे कारण देत औषधे महागल्याचे म्हटले जात आहे.
ही औषधे महागली
बीपीच्या दहा गोळ्यांची एक स्ट्रिप : आधीची किंमत 172 रूपये आताची किंमत 190 रुपये
डायबेटीज गोळ्यांची एक स्ट्रीप आधी 11 रुपये 30 पैसे होती आता 18 रुपये 50 पैसे इतकी महागली
अँटासिडच्या 15 गोळ्यांची किंमत पूर्वी 24 रुपये होती ती आता 37 रुपये झाली
डेटॅालची 105 रुपयांची बाटली आता 116 रुपये झाली आहे
कॅल्शियम गोळ्यांच्या किंमत 99 रुपयांवरुन 110 रुपयांवर गेली आहे
झेंडू बामच्या एका बाटलीची किंमत ३५ रुपये होती आता ही किंमत ४० रुपये पेक्षा अधिक असेल