आणखी किती दिवस राज्यपाल रुग्णालयात?; मेडिकल बुलेटीन जारी

आणखी किती दिवस राज्यपाल रुग्णालयात?; मेडिकल बुलेटीन जारी

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड करून शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का दिला आहे. आतापर्यंत चाळीस हून अधिक आमदार एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटात सामील झाल्याचे समजते. एकनाथ शिंदे हे कालच मुंबईकडे (Mumbai) रवाना होणार होते...

मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांची भेट टळली आहे. कोश्यारी यांना मुंबईतील (Mumbai) गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. .

आणखी किती दिवस राज्यपाल रुग्णालयात?; मेडिकल बुलेटीन जारी
एकीकडे राजकीय भूकंप दुसरीकडे मंत्रालय हाऊसफुल्ल; 'हे' आहे कारण

आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या प्रकृतीबाबत मेडिकल बुलेटीन जारी करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यपाल यांची प्रकृती आता उत्तम असल्याचे समजते. ते उद्या राजभवनात परतणार का? याबाबत आज डॉक्टर निर्णय घेणार आहेत.

आणखी किती दिवस राज्यपाल रुग्णालयात?; मेडिकल बुलेटीन जारी
शिंदे गटात इतके आमदार कसे?; काँग्रेस-राष्ट्रवादीची शंका

राज्यपालांची प्रकृती अशीच उत्तम राहिली तर ते उद्या राजभवनात परतण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्याची परिस्थिती पाहता राज्यपाल पुन्हा राजभवनात कधी परतणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com