Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यागोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी उपाययोजना

गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी उपाययोजना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गोदावरी नदीत ( Godavari River ) कुठलेही मलजल (Sewage)जाणार नाही. गोदावरी नदी प्रदूषणमुक्त (Pollution freeGodavari River ) करण्याच्या दृष्टीने आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar )यांनी बोटीने, पायी व वाहनाद्वारे अहिल्याबाई होळकर पूल ते जलालपूर, गोवर्धन मनपा हद्दीपर्यंत पाहणी करून त्वरित त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.

- Advertisement -

गोदावरी नदीत होणारे प्रदूषण टाळण्याचा दृष्टीने उपाययोजना करून गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त रमेश पवार यांनी अहिल्याबाई होळकर पूल ते जलालपूर गोवर्धन मनपा हद्दीपर्यंत पाहणी केली. या पाहणीचा वेळी सुमारे 50 ठिकाणी पाईप नदीत सोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यापैकी 40 पाईप कुठलाही प्रवाह दिसून आलेला नाही.

उर्वरित 10 ठिकाणी मलजल नदीत मिश्रित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या ठिकाणी तत्काळ खालीलप्रमाणे लोकल उपाययोजना करून ‘लोकल सोल्युशन’ काढण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. यावेळी अभियंता शिवकुमार वंजारी,अधीक्षक अभियंता एस. एम. चव्हाणके, अग्निशमन दल प्रमुख एस. के. बैरागी, कार्यकारी अभियंता गणेश मैंद, उप अभियंता नितीन राजपूत, संजय आडेसरा, स्मार्ट सिटी विभागाचे कानडे आदी उपस्थित होते.

अशा आहेत उपाययोजना

लेंडी नाल्यातील मलजल हे स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असलेल्या 900 मीटर व्यासाच्या मलनिस्सारण वाहिनीत वळविणे.

साळुंखे क्लासेस येथील मलजल मागील डाव्या तटावरील बाजूची मलवाहिका रामवाडीच्या मुख्य रस्त्यावरील मलवाहिकेस जोडणे.

मल्हार खान येथील मलजल गोदावरी नदीच्या उजवीकडील मलनिस्सारण वाहिनी दुरुस्त/ मजबुतीकरण करून त्याला जोडणे.

चोपडा नाला ब्रिजच्या दोन्ही बाजूचे मलजल, हे पंपिंग स्टेशनमधील मलजल उपसा केंद्रात वळविणे.

परीचा बाग येथील पावसाळी नाल्यातील ड्रेनेजचे पाणी बंद करणे.

जुन्या पंपिंग स्टेशनपासून गोदावरी नदीवरील ब्रिजवरून जाणारी रायझिंग मेंन पुढे तपोवन मलजल शुद्धीकरण केंद्रापर्यंत टाकणे.

चिखली नाल्यातील एमआयडीसीचे व मलजलचे पाणी, जवळील मलनिस्सारण वाहिनीचे चेंबर दुरुस्ती करून त्यात वळविणे.

गंगापूर मलजल जलशुद्धीकरण केंद्राचे प्रक्रियायुक्त पाण्याचा पुनर्वापर शेतीसाठी औद्योगिक कामाकरिता व गार्डन करिता करणेबाबत ींशीींळरीू ीींशरीांशपीं श्रिरपीं /पंपिंग स्टेशन टाकण्याबाबत उपाय योजना करणे.

आनंदवली नाल्याचे ड्रेनेजचे पाणी लोकल पंपिंग करून जवळील मलनिस्सारण वाहिनीस टाकणे. उपरोक्त 10 ठिकाणचे मलजल पाणी याप्रकारे इतरत्र वळवून ते गोदावरी नदीत अजिबात येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या