
जळगाव jalgaon। प्रतिनिधी
जिल्हा बँकेत (District Bank) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) स्पष्ट बहुमत असतानाही भाजप-शिवसेना शिंदे (BJP-Shiv Sena Shinde group)गटाने सुरुंग लावून महाविकास आघाडीला खिंडार पाडून संजय पवार यांना पाठिंबा देवून सत्ता परिवर्तन (Change of power) केले. मात्र, जळगाव बाजार समितीमध्ये (Jalgaon Market Committee) जिल्हा बँकेची पुनरावृत्ती (avoid repetition) टाळण्यासाठी महाविकास आघाडीने सावध पवित्रा (careful posture) घेत नवनिर्वाचित संचालकांची गुप्त बैठका होऊन संचालक फुटू नये, यादृष्टीने प्रयत्न सुरु आहे. तसेच मविआचे निवडून आलेल्या संचालकांवर तिसर्या डोळ्याची नजर असल्याची चर्चा रंगत आहे.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत चशेतकरी विकास पॅनलचे 11 संचालक तर भाजप-शिवसेना शिंदे गट पुरस्कृत सहकार पॅनलच्या 6 आणि अपक्ष एक उमेदवार निवडून आलेले आहेत. यात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी जिल्हा बँकेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महाविकास आघाडीने सावध पवित्रा घेतला जात आहे.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत सभापती निवड झाली पाहिजे, असा नियम आहे. निवडणूक विभागाकडून सभापती निवडीचा कार्यक्रम अजून जाहीर झालेला नसल्याने महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या संचालकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
पहिला मान कोणाला मिळणार
जळगाव कृउबा समिती सभापती निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच नवनिर्वाचित संचालकांमधून सभापती निवडीसाठी चर्चेचे गुर्हाळ सुरुच आहे. यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले सुनिल महाजन हे प्रथम क्रमांकावर असून त्यानंतर लक्ष्यमण पाटील, शामकांत सोनवणे अशी सभापती पदाची दावेदारी सुरु आहे.यात कोणाला सभापती पदाचा पहिला मान मिळणार याविषयी उत्सुकता लागून आहे.
सभापती निवडीचे लागले वेध
जळगाव बाजार समिती निवडीची मतमोजणी दि.30 एप्रिल रोजी झाल्यानंतर विजयी झालेल्या संचालकांनी आपल्या गावात जल्लोष केला. त्यानंतर नवनिर्वाचित कृउबा समिती संचालक आपआपल्या कामात व्यस्त झालेले आहेत. आता जळगाव बाजार समितीची निवडणूक होऊन 10 दिवस झाले असून आता सर्व संचालकांना सभापती निवडीचे वेध लागले आहे.