Friday, April 26, 2024
HomeUncategorizedलतादीदींच्या प्रकृतीबाबत महत्वाचे Update, डॉक्टर म्हणाले...

लतादीदींच्या प्रकृतीबाबत महत्वाचे Update, डॉक्टर म्हणाले…

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) मागच्या काही दिवसांपासून कोरोना झाल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँन्डी (Breach Candy Hospital Mumbai) रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये थोड्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. मात्र सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती डॉ. प्रतित समदानी यांनी एनआयला दिली.

मालेगावच्या युवकाच्या उद्योगात ‘लेन्सकार्ट’चे सीईओ झाले भागिदार

- Advertisement -

लतादीदींची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली आहे. लतादीदींच्या प्रकृतीबाबत रोज अपडेट्स देणं शक्य नाही. काही गोष्टी या खासगी असू शकतात त्यामुळे प्रत्येकवेळी अपडेट देणं शक्य होईलच असं नाही. मात्र आपल्या सगळ्यांच्या प्रार्थनांमुळे लतादीदींची प्रकृती सुधारत आहे.

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. हा खूप मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. कोणतीही अधिकृत माहिती आल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन यावेळी डॉक्टरांनी केलं आहे. लतादीदींच्या प्रकृतीबाबत सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमचं सहकार्य लाखमोलाचं आहे असंही यावेळी सांगण्यात आलं आहे.ल

- Advertisment -

ताज्या बातम्या