एकलव्य संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

एकलव्य संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

नाशिक । नरेंद्र जोशी Nashik

मणीपुर घटनेचे पडसाद देशभर उमटत असताना आज नाशिक शहरात एकलव्य संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.मोर्चेकर्‍यांनी कार्यालयासमोर भर रस्त्यात ठिय्या आंंदेांलन केल्याने सीबीएस ते मेहेर चौकापर्यंतची वातुक ठप्प झाली होती.

आज दुपारी गोल्फ क्लब मैदान- त्र्यंबक नाका सिग्नल-जिल्हा परिषद-खडकाळी सिग्नल शालिमार- सीबीएस- जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत एकलव्य संघटनने मोर्चा काढला. मोर्चांचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यानी केले होते. नितीन मोरे ,देवा वाटाणे, केैलास शार्दुल यांच्या मार्गादर्शनाखाली कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

गेल्या महिना दोन महिन्यांपासून मणीपुर राज्यात वातावरण पेटलेले आहे. त्यावरून देशभरात पडसाद उमटत असून निषेध आंदोलने केली जात आहेत.नाशिक जिल्ह्यातही विविध भागात मणिपूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलने केली जात आहेत. बागलाण तालुक्यातील सटाणा शहरात देखील आदिवासी समाजाच्या वतीने अर्धनग्न मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

मणिपूर येथील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून सटाणा तहसील कार्यालयावर ‘अर्धनग्न’ मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या मोर्चाला गालबोट लागले, दगडफेकीची घटना घडली. त्यामुळे शहर परिसरात वातावरण तापू नये म्हणुन पोलिसनी यंदा विशेष दक्षता घेतला होती. मोर्चेकरी जो पर्यंतथाबतील तो पर्यंंत थाबु दिले.शांतता होई पर्यंत संयम ठेवला.त्यनंतर ढवळे यांनी प्रशासनाला निवेदन दिले. त्यावेळी 'नारी के सन्मान मे आदीवासी मैदान मे।' अशा घोषणांनी परीसर दणाणुन सोडला होता.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com