Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याआशा व गट प्रवर्तक संघटनेचा आज मोर्चा

आशा व गट प्रवर्तक संघटनेचा आज मोर्चा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

ग्रामपंचायतने ( Grampanchayat )थकीत करोना प्रोत्साहन भत्ता द्यावा, गट प्रवर्तकांना वेतन सुसूत्रीकरणमध्ये समावेश करावे, भाऊबीज भेट लागू करावी, आदी मागण्यांसाठी आशा व गट प्रवर्तक यांचा दि. 3 ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्हा परिषेदवर ( Zilla Parishad Nashik ) भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 11.30 वा. बी. डी. भालेकर मैदान, कालिदास कलामंदिर नाशिक येथून सुरुवात मोर्चाला सुरुवात होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना( आयटक) राज्य अध्यक्ष राजू देसले यांनी दिली.

- Advertisement -

आशा व गट प्रवर्तकना शासन निर्णय 2020 अन्वये ग्रामपंचायतने करोना काळात आशा व गट प्रवर्तकांची कामाची दखल घेऊन करोना प्रोत्साहन भत्ता आशा व गट प्रवर्तकांना द्यावा,असे शासन पत्रक असतांना नाशिक जिल्ह्यात अल्प प्रमाणात फक्त अंमलबजावणी होत आहे. त्यात वेगवेगळ्या ग्रामपंचायत 2 – 4 महिन्यांचा भत्ता देऊन पूर्ण भत्ता देण्याचे नाकारत आहे. आजही बहुसंख्य ग्रामपंचायतने करोना प्रोत्साहन भत्ता दिलेला नाही.

जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांना 2- 2 वेळा पत्र , अनेक निवेदन, आंदोलन करूनही दखल घेतली जात नाही. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक यांनाही निवेदने दिली आहेत. त्यांच्या पत्राची अंमलबजावणी होत नाही. त्वरित थकीत करोना कामाचा थकीत प्रोत्साहन भत्ता दीपावली पूर्वी देऊन आशा व गट प्रवर्तकाचा गौरव सर्व ग्रामपंचायतने करावा.

या मागणीसाठी व गट प्रवर्तक आरोग्य विभागातील इतर कंत्राटी कर्मचारीप्रमाणे वेतन सुसूत्रीकरणमध्ये समावेश करावा. गट प्रवर्तक व आशा ना किमान वेतन लागू करा. थकीत मानधन त्वरित द्या. दरमहा कामाचा संपूर्ण मोबदला 10 तारखेच्या आत द्या. कुष्ठरोग सर्व्हेचा मोबदला त्वरित वाढवावा.थकीत मोबदला द्यावा, दीपावलीला भाऊबीज भेट लागू करा. केंद्र सरकारने 2018 पासून मानधनात वाढ केलेली नाही ती त्वरित करावी. आदी मागण्यांसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.सर्व आशा व गट प्रवर्तकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना नाशिक जिल्ह्याच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या