Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामराठी व्यवहारातील ज्ञानभाषा होणार - फडणवीस

मराठी व्यवहारातील ज्ञानभाषा होणार – फडणवीस

मुंबई | Mumbai  

मराठी भाषेच्या व्यावहारिक उपयोगीतेविषयी महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) विशेष प्रयत्न करणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वर्धा येथे सुरु असणाऱ्या साहित्य संमेलनात व्यक्त केले…

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, मराठी ज्ञानभाषा आहेच. मात्र,आता सगळ्या प्रकारचे शिक्षण (Education) मराठीतून मिळेल. परिणामी मराठी (Marathi) व्यवहारातील ज्ञानभाषा होईल. त्यामुळे मराठीबाबत व्यक्त होत असलेली चिंता पुढे राहणार नाही, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. वर्धा (Wardha) येथील महात्मा गांधी (Mahatma Gandi) साहित्य नगरीत सुरु असलेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अखेरच्या सत्रात ते बोलत होते.

फडणवीस पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या शैक्षणिक धोरणात भाषांना नवी दिशा देण्याचे सामर्थ्य आहे. तसेच फडणवीसांनी आपल्या शैलीत राजकीय फटकेबाजी देखील केली. यावेळी त्यांनी शताब्दी वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघास (Vidarbha Sahitya Sangh) दहा कोटी रुपये राज्य शासनातर्फे देण्याचेही जाहीर केले.

दरम्यान, याप्रसंगी खासदार रामदास तडस, डॉ.अनिल बोंडे, आमदार पंकज भोयर, समीर कुणावर, समीर मेघे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या (Marathi Sahitya Mahamandal) अध्यक्षा उषा तांबे तसेच प्रदीप दाते व सागर मेघे यांच्यासह आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या