Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यामराठी साहित्याला विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनाची गरज : डॉ.नारळीकर

मराठी साहित्याला विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनाची गरज : डॉ.नारळीकर

नाशिक | टीम देशदूत Nashik

साहित्यिक व रसिक यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणे गरजेचे आहे. विज्ञानकथा लिहिताना वाचकाला समजेल, वाचक आत्मसात करतील या भाषेत लिहिण्याची गरज निर्माण झाली आहे. शालेय शिक्षणामध्ये प्रामुख्याने गणित आणि विज्ञान हे विषय वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिल्यास विज्ञानाबद्दलची भीती दूर होऊन जवळीकता निर्माण होईल आणि त्याबद्दल एक चांगला संदेश जनतेपर्यंत जाईल, असे प्रतिपादन ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे 94th Literary Convention अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर Dr. Jayant Narlikar यांनी केले. संमेलनाला त्यांची उपस्थिती नसली तरी त्यांनी आपले भाषण संवादित करून पाठवले होते.

- Advertisement -

यावेळी संमेलनाचे उद्घाटक कादंबरीकार विश्वास पाटील, प्रमुख अतिथी जावेद अख्तर, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, कृषिमंत्री दादाजी भुसे, आमदार सरोज आहेर, हिरामण खोसकर, आमदार सुधीर तांबे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड मुख्य निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, प्रमुख कार्यवाह हेमंत टकले, संजय करंजकर, शंकर बोऱ्हाडे, विश्वास ठाकूर आदी उपस्थित होते.

यावेळी स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी, प्रमुख अतिथी जावेद अख्तर, उद्घाटक कादंबरीकार विश्वास पाटील, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, माजी संमेलनाध्यक्ष नागनाथ कोतापल्ले, सदानंद मोरे, श्रीपाद सबनीस, उत्तमराव कांबळे, लक्ष्मीकांत देशमुख, बडोदा संस्थांच्या शुभांगी राजे गायकवाड, खासदार श्रीनिवास पाटील यांचे स्वागत केले.

माजी आमदार हेमंत टकले यांनी सूत्रसंचालन केले. प्रारंभी पं. मकरंद हिंगणे व सहकाऱ्यानी कुसुमाग्रज यांचे ‘गर्जा जयजयकार’हे गीत सादर केले व संमेलन मंडपात चैतन्य निर्माण झाले. यावेळी मिलिंद गांधी व संगीतकार संजय गीते यांनी तयार केलेले संमेलनगीत सादर केले.

विज्ञानकथा लिहिताना एक विशिष्ट हेतुनुसार एखादी मनोवेधक वैज्ञानिक कल्पना वाचकापर्यंत आणायची असेल तर ती गोष्टीरूपाने मांडता येणे आवश्यक आहे; अशी भावना लेखकाला प्रेरित करू शकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केल. कुठल्याही भाषेतले साहित्य ती भाषा वापरणाऱ्या समाजातील घडामोडींनी प्रभावित झालेले असते. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या वाढत्या वापरामुळे मानव अधिकाधिक यंत्रावलंबी होत चालला आहे हे विसरून चालणार नाही.

गेले वर्षभर सगळ्या जगात कोविडच्या व्हायरसने थैमान घातले आणि बरेच नुकसान केले. एक प्रकारे आपण विज्ञानकथेत वर्णन केलेली स्थिती अनुभवत आहोत. वैज्ञानिक मार्गाने वैद्यकीय लस शोधणे हाच सर्वमान्य उपाय ठरला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मा. दुर्गाबाई भागवत यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आपल्या अध्यक्षीय भाषणात माझ्या लिखाणाचा गौरव केला. पुढे तर मुकुंदराव किर्लोस्कर यांनी भविष्यवाणी केली की पुढे मागे मी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवीन, ही आठवण देखील त्यांनी यावेळी सांगितली.

यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात, साहित्य संमेलनाची आखणी करताना आपल्याला राजाश्रय हवा असतो; आणि शासनाने तो दिला पाहिजे असे मत व्यक्त केले. लेखकांवर कोणी निर्बंध लढणार असेल तर त्याला पहिला विरोध मी करेल, असे प्रतिपादन केले. मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे. सात वर्षे झाली केंद्राकडे अभिजात मराठीचे प्रकरने पडून आहेत. मराठी ही श्रेष्ट भाषा असून तिला ५२ बोलीभाषा आहेत. असे सांगतानाच नाशिकचा गौरवकथा त्यांनी मांडली. नाशिकमधून सुंदर कविता लिहिणारे कांबळे यांनी नाशिकला चांगली ओळख दिली.

खैरनार गुरुजींनी कितीतरी ग्रंथ प्रदर्शांत भरवली. येवल्यात त्यांनी घोषणा केल्यानंतर हे स्थळ आपण जपले आहे. यानंतर दलित साहित्य वाढले. मराठी साहित्याला यातूनच उभारी आली. दलित साहित्य, दलित मुक्ती लढा, दलित चळवळी या झाल्या. नाशिकमधील रंगुबाई जुन्नरे, परशुराम सायखेडकर यांसारख्या दानशूर व्यक्तींनी इतिहास घडवला. सध्या साहित्यिक मंचावर राजकीय भाषणे होत असतात मात्र शरद पवार हे याला अपवाद आहेत; यांचे भाषण साहित्यिक मंचावर कधिच राजकीय झाली नाहीत.

अभिजात दर्जा मिळावा

मुख्यमंत्री यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. मराठी भाषा ही अभिजात व्हावी यासाठी मराठी जनांनी एक व्हावे, त्यासाठी राष्ट्रपतींना पत्र पाठवावे असे आवाहन त्यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाईन मार्गदर्शन केले. उदघाटन प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या