Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रआंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे कोरोनाने निधन

आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे कोरोनाने निधन

मुंबई :

कोरोना उद्रेकात अनेकांचे जीव जात आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे आज कोरोना संसर्गामुळे निधन झाले. ते ३४ वर्षांचे होते. त्यांनी भारत श्री खिताबही पटकावला होता.

- Advertisement -

खरंच नाशिकला लॉकडाऊनचा फायदा झाला का? रुग्णसंख्येवर काय फरक पडला?

मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. त्याच्यावर गुजरातमधील बडोदा येथे उपचार सुरु होते. तिथेच त्याने अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपूर्वीच जगदीश नवी मुंबईहून बडोदा येथे स्थायिक झाले. बडोदा येथे त्यांनी बॉडीबिल्डींगची नवी सुरूवात केली. ते हे मुळचे सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचा होते. त्यांना लहानपणापासूनच बॉडी बिल्डिंगचे आकर्षण होते. पिळदार शरीरयष्टीच्या जगदीश यांनी महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा गाजवल्या. त्यांनी नवी मुंबई महापौर श्रीसह मोठ मोठ्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदके पटकावले होते.

दरम्यान, जगदीश लाडच्या निधनाने बॉडीबिल्डिंग विश्वावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोशिएशन आणि मुंबई असोशिएशनने त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या