शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अंगलट; केतकी चितळेला पोलिसांनी घेतलं ताब्यात

शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अंगलट; केतकी चितळेला पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई । Mumbai

छोट्या पडद्यावरील मराठी अभिनेत्री (Marathi actress) केतकी चितळेनं (Ketki Chitale) राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत....

केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे राज्यात मोठा वाद सुरू झाला आहे. त्यानंतर आता केतकी चितळेवर पोलिसांनी कारवाई करत तिला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

अभिनेत्री केतकी चितळे हिला अटक केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमधून केतकी चितळेला अटक केल्याप्रकरणी ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांचं (Mumbai Police) अभिनंदन केलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला पदाधिकाऱ्यांकडून केतकी चितळेवर (Ketaki Chitale) शाई आणि अंडी फेकण्यात आली. कंळबोली पोलीस केतकीला ठाण्याबाहेर आणताना हा प्रकार घडला आहे.

Related Stories

No stories found.