Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशmaratha reservation : सुनावणी स्थगितीस नकार, पण राज्यांना दिली मुदत

maratha reservation : सुनावणी स्थगितीस नकार, पण राज्यांना दिली मुदत

नवी दिल्ली

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालतात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीच्या वेळी काही राज्यांनी वेळ वाढवून मागितला. यावर न्यायालयाने सुनावणी स्थगित न करता एक आठवड्याचा वेळ वाढवला आहे.

- Advertisement -

सर्वोच्य न्यायालयात आजच्या सुनावणीत तामिळनाडू, केरळ राज्यांनी निवडणुका आहेत म्हणून वेळ वाढवून मागितला. यावर निवडणुका आहेत म्हणून आम्ही सुनावणी स्थगित करू शकत नाही असे असे पाच न्यायमुर्तींच्या खंडपीठाने सांगितले. यावेळी खंडपीठाने सर्व राज्यांना एक आठवड्यांचा वेळ दिलेला आहे. सुनावणीच्या सुरुवातीला तामिळनाडूच्या वकिलांनी वेळ वाढवून मागितली होती. यावर कोर्टाने सांगितलं की राज्यांचा नंबर ८ दिवसांनी येईल, तुमच्याकडे एक आठवड्याचा वेळ आहे. अजून तेव्हा काही प्रॉब्लेम आले तर बघू असे खंडपीठाने सांगितले. सुनावणीला आधीच खूप विलंब झाला आहे असे म्हणत कोर्ट सुनावणी चालू ठेवण्याच्या बाजूने आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या