केंद्र-राज्य भांडणात पडायचं नाही, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्या

केंद्र-राज्य भांडणात पडायचं नाही, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्या

नांदेड

आम्हाला केंद्र-राज्य भांडणात पडायचं नाही, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्या, हीच आमची मागणी आहे," असं प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.

आज नांदेड येथे मराठी समाजाच्या वतीनं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मूक मोर्चाची हाक देण्यात आली होती. खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्त्वात हे आंदोलन पार पडलं. हा लॉकडाऊन नंतरचा मराठा आरक्षणाचा पहिलाच मूक मोर्चा आहे. यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी आक्रमक पवित्रा घेत मराठा समाजाची भूमिका मांडली. तसेच मराठा आरक्षण मंजूर करण्यासाठी त्यांना काही पर्यायही सुचवले.

अशोक चव्हाण यांच्यावर घणाघात

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर खोचक टीकाही संभाजीराजे यांनी केली. ते म्हणाले, मराठा आरक्षणाची जबाबदारी नांदेडच्या सुपुत्राने घ्यावी. पण ते कुठे आहेत? इथेही ते आलेले नाहीत. ते जेव्हा दिल्लीमध्ये आले होते, तेव्हा सगळ्यांना भेटले. काँग्रेसच्या नेत्यांनाही भेटले पण मला भेटले नाहीत. संभाजीराजेंना भेटायला त्यांना वेळ नव्हता. पण समाजाला दिशाहीन करुन चालणार नाही. मला एक पत्र आलं आहे. 15 पानी पत्र आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे पत्र पाठवलं. आम्ही समाजासाठी काय करतोय हे यात सांगितलं आहे. पण या पत्रात इतक्या तफावती आहेत. सरकार प्रामाणिक असतं तर हे पत्र पालकमंत्र्यांच्या हस्ते (अशोक चव्हाण) मला देणं अपेक्षित होतं, पण ते दिलं नाही.

माझे फोटो काढून काहीच उपयोग नाही

मी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यासाठी इथं आलो नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा विचार सांगायला आलोय. जर माझं ऐकायचं असेल, तर आपण बोलूच. माझे फोटो काढून काहीच उपयोग नाही. किती फोटो काढायचे?" पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले की, "हे खरं तर मराठा क्रांती मूक आंदोलन होतं. मराठा क्रांती मूक आंदोलन म्हणजे काय? तर 58 मोर्चे आपण काढले, या माध्यमातून समाजानं आपली भावना व्यक्त केली की, आपल्याला आरक्षण का पाहिजे? समाज बोलला, समन्वयक बोलले, आम्ही बोललो आता लोकप्रतिनिधिंनी बोलावं आणि बोलत असताना कृतीतूनही दाखवावं, हा माझा संदेश होता.”

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com