Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : ...अखेर सरकारकडून मागण्या मान्य, खासदार संभाजी छत्रपतींकडून उपोषण मागे

Maratha Reservation : …अखेर सरकारकडून मागण्या मान्य, खासदार संभाजी छत्रपतींकडून उपोषण मागे

मुंबई | Mumbai

मराठा समाजाच्या (maratha reservation) मागण्यांसाठी गेली दोन दिवस सुरू असलेलं उपोषण हे खासदार संभाजीराजे छत्रपतींनी ((sambhaji chhatrapati)) सोडलं आहे.

- Advertisement -

उपोषण स्थळी एका लहान मुलाच्या हातून रस घेऊन खासदार संभाजीराजेंनी हे उपोषण सोडलं आहे. मराठा समाजाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याने हे उपोषण सोडत असल्याचं खासदार संभाजीराजेंनी सांगितलं.

संभाजीराजे म्हणाले, आरक्षण हा दीर्घकालीन लढा आहे. मला आनंदानं सांगायचंय की, ज्या मागण्या समोर ठेवल्या होत्या त्यातील काही मागण्या मान्य झाल्या आहेत. मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री वळसे पाटील, अमित देशमुख यांच्यासह इतर नेते इथे आले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. मलासुद्धा वाचवलंत याबद्दलही आभार मानतो.

कोणत्या मागण्या झाल्या मान्य?

१) सारथीचं व्हिजन डॉक्युमेंट ३० जूनपर्यंत तयार करणार

२) सारथीमधील रिक्त पदं मार्च २०२२ पर्यंत भरणार

३) आण्णासाहेब पाटील महामंडळाला अतिरिक्त १०० कोटींचा निधी देणार

४) गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व वसतीगृहांचं उद्घाटन करणार

५) मराठा आरक्षणासाठी गुन्हे दाखल झालेल्या तरुणांचे गुन्हे मागे घेणार

६) मराठा आंदोलनात मृत पावलेल्या नातेवाईकांना एसटी महामंडळात १८ जणांना नोकरी देण्यात आली आहे, इतरांनाही ताबडतोब नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

७) ज्यांचावर गुन्ह्यांमध्ये सहभाग नव्हता त्यांच्यावरील देखील गुन्हे मागे घेण्याबाबत केस टू केस प्रकरण निहाय निर्णय घेण्यात येईल.

८) त्याचबरोबर असे जे गुन्हे मागे घेतलेले आहेत परंतू न्यायालयीन पटलावर प्रलंबित आहेत त्याचा आढावा घेऊन त्याचा निर्णय घेण्यात येईल.

९) आंदोलनात मृत पावलेल्या मराठा समाजाच्या व्यक्तींच्या कागदपात्रांची पूर्तता करून नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या