Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रmaratha reservation : ...तर ७ जूनपासून रायगडावरुन आंदोलन

maratha reservation : …तर ७ जूनपासून रायगडावरुन आंदोलन

मुंबई :

मराठा आरक्षण (Maratha reservation) रद्द झाल्यानंतर राज्यातील नेत्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji raje Chhatrapati) यांनी यांनी महाराष्ट्र दौरा केला. त्यानंतर शुक्रवारी दुपारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि दुपारी तीनच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीनंतर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji raje Chhatrapati) यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली.

- Advertisement -

दहावीची परीक्षा : निकालाबाबत समाधानी नसल्यास काय करता येईल ?

संभाजीराजे म्हणाले, “सकल मराठा समाजाच्या वतीने मी बोलत आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात किंवा कोणता राजकीय अजेंडा घेऊन अजिबात आलेलो नाही. आमची एकच मागणी आहे की सकल मराठा समाजाला न्याय मिळावा. समाजाला न्याय द्या ही माझी भूमिका होती. म्हणून आम्ही महाराष्ट्राचा दौरा केला. कायदेतज्ज्ञांना भेटलो, अभ्यासकांनाही भेटलो. भावना समजू घेतल्या. याप्रसंगी मराठा समाजातले लोकं इतके दु:खी आणि अस्वस्थ आहेत. वेळप्रसंगी कायदा हातात घेतील अशी अवस्था आहे. पण माझ्यामुळे सगळे शांत आहेत. आम्हालाही आक्रमक होता येतं. पण ही वेळ आहे का आक्रमक व्हायची? किती वर्ष आपण या वर्गाचा वापर करायचा? मराठा समाजातला ३० टक्के वर्ग कधीच रस्त्यावर येत नाही. फक्त ७० टक्के गरीब वर्ग रस्त्यावर येत असतो. पण यापुढे आम्ही कुणीच हे चालून देणार नाही”, अशा शब्दांत संभाजी राजे यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.

६ जून हा शिवराज्यभिषक दिन आहे. तोपर्यंत मराठा सामाज्याच्या ५ मागण्यांवर विचार झाला नाही तर आमचे आंदोलन ७ जूनपासून सुरु होईल. रायगडापासून हे आंदोलन सुरु करण्यात येणार आहे.

खाद्यतेल का महाग होत आहे ? जाणून घ्या कारण

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

१) मराठा समाजासाठी सारथीचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. सारथीसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करावी

२) ओबीसी मध्ये नवीन प्रवर्ग तयार करता येऊ शकते का हे पूर्वीच्या सरकारने मुख्यमंत्र्यांनी, शरद पवाराांनी स्पष्ट करावे.

३) ३४२ ए च्या माध्यमातून आपला प्रस्ताव केंद्राकडू मांडू शकता. या माध्यमातून आपला प्रस्ताव राज्यपालांसमोर मांडावा.

४) गायकवाड अहवालातील तृटी दुर करा. राष्ट्रपतींकडे विषय सादर करावा आयोग स्थापन करा

५) राज्य सरकारने पुर्नविचार याचिका दाखल करायला हवी.

६)मराठा समाजासाठी २ दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवा. समाजासाठी काय करणार ते सांगा.

७)दिल्लीला ९ ऑगस्टला क्रांती दिन आहे. महाराष्ट्रातील सर्व खासदार, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांना बोलवणार आहे. आता गोलमेज परिषद महाराष्ट्रात नाही तर दिल्लीत होईल.

८)वंचितांना आरक्षण मिळावं हे माझं मत आहे. गोडी गुलाबीने समाज राहायला हवा. बाबासाहेबांचीही संकल्पना होती, मराठ्यांना आरक्षण मिळावे.

९)वसतीगृह : प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभा करा. ते तुमच्या हातात आहे, ते करा.

१०) अण्णासाहेब महामंडळातून गरीब मराठ्यांना उद्योग उभं करुन देऊ शकता. दहा लाखाचं लिमिट आहे. मात्र ही मर्यादा २५ लाख करा. कर्ज काढायला गेल्यावर जमीन मॉर्गेज मागतात, मात्र जमिनीच नाहीत तर देणार काय?

मुख्यमंत्र्यांकडे केल्या या पाच मागण्या

१) ९ सप्टेंबर २०२० पर्यंत नियुक्त्या झाल्यात त्यांना रुजू करुन घ्या हे सांगितलं, मग राज्य सरकार थांबलंय का? लोकांच्या भावनांशी का खेळताय? गरिब मराठ्यांना न्याय द्या

२) शाहू महाराजांच्या नावाने सारथी संस्था उभी केली, मात्र त्याची अवस्था काय आहे? सारथीला स्वायत्तता दिली तर आरक्षणापेक्षाही उत्तम ठरेल. माझं हे मोठं वक्तव्य आहे. सारथीला १ हजार कोटी द्या.

३) अण्णासाहेब महामंडळातून गरीब मराठ्यांना उद्योग उभं करुन देऊ शकता. दहा लाखाचं लिमिट आहे. मात्र ही मर्यादा २५ लाख करा. कर्ज काढायला गेल्यावर जमीन मॉर्गेज मागतात, मात्र जमिनीच नाहीत तर देणार काय?

४) वसतीगृह : प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभा करा. ते तुमच्या हातात आहे, ते करा.

५) ७० टक्के गरीब मराठा समाज आहे. मी शाहूंचा वंशज आहे. गरीबांवर अन्याय होऊ देणार नाही. ज्या सवलती शिक्षणामध्ये ओबीसींना मिळतात, त्या गरीब मराठ्यांनाही द्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या